शेवगे, सतारे,पिंपळगाव लेप येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.20जून):- बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा तर्फे येवला तालुक्यातील शेवगे, सातारे,पिंपळगाव लेप येथे मोफत नेत्र तपासणीशिबीरआयोजित करण्यात आले होते.याचे उद्घघाटन माणिकराव रसाळ, लक्ष्मीबाई ठोंबरे, पत्रकार दीपक ढोकळे, पत्रकार पांडुरंग शेळके यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शंकरराव झांबरे, सुलाबाई दिवटे, प्रवीण झांबरे, सिंधुबाई आहेर, विकास खैरनार, बन्सी गोसावी, सुखदेव ठोकळे,रतन रसाळ, मधुकर ठोकळे, दिवाकर दुनबळे, वृषाल डमाळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

डॉ.राजूखान सय्यद यांच्या माध्यमातून डॉ.अखीलेश रजपुत, डॉ.अजित यादव यांनी यावेळी महिला-पुरुष यांची नेत्र तपासणी केली.नेत्र रुग्णांनाच्या पुणे येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा मार्फत करण्यात येणार आहे.अशी माहीती रोहन डमाळे यांनी दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED