स्वामी समर्थ सेवा केंद्र व बाल संस्कार केंद्राकडून गुणवंताच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

🔸मुलांच्या कौतुकाने आई-वडील झाले भावूक

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20जून):- संतानी सांगितलेला सदविचार प्रत्यक्ष कृतीत आणल्याशिवाय समाज उध्दार होणार नाही, हा विचार प्रमाण मानून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत नवनवीन उपक्रम राबविणा-या गंगाखेड येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र व बाल संस्कार केंद्राकडून दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या गुणवंत मुलांचा नुकताच भव्य असा सत्कार करण्यात आला. सत्कार झालेल्या गुणवंतांमध्ये वेदांत विद्यालयातून पैकीच्या पैकी म्हणजेच १००% गुण प्राप्त केलेल्या कु.प्रितेश किरण सोळंके याच्यासह ९५% गुण मिळविलेल्या कु.सृष्टी नागनाथ शिसोदिया, ९४% गुणांसह यशस्वी ठरलेल्या कु.प्रतिक यशवंत वाळके, ९१ % गुणाला घवसणी घातलेल्या कु.स्नेहा दत्तात्रय वरवडे आणि ९०% टक्के गुण मिळवून नावलौकिक मिळविलेल्या कु.गायत्री गजानन काळे यांचा समावेश आहे.

आपल्या मुलांच्या कौतुकाने भारावून गेलेल्या आई-वडीलांच्या डोळ्यात यावेळी आनंदाश्रू उभे राहिले होते. समर्थ कृपेचा हा आशीर्वाद असून मुलांनी आपल्या श्रमाचं चीज केलं. रात्री-अपरात्री उठून अभ्यास केला. कधीही कंटाळा केला नाही. अभ्यासात सातत्य ठेवलं त्यामुळेच हे यश त्यांना मिळविता आलं, अशा समिश्र प्रतिक्रिया गुणवंत मुलांच्या आई-वडीलांनी दिल्या आहेत.

यावेळी केंद्र प्रतिनिधी सेवेकरी माधव भाऊ शिंदे व बालसंस्कार प्रतिनिधी मायाताई फड यांच्यासह रत्नमालाताई काळे, ललिताताई वरवडे, सुरेखाताई शिसोदिया, छायाताई सोळंके, सुरेखाताई वाळके, अच्युत जाधव, बालाजी कदम, कृष्णा भायकर, करण शिंदे, संगीताताई पौळ, रोहन गावडे, महेश मोहनाळकर, वर्षाताई भोसले, दुर्गाताई चव्हाण, उर्मिला गयाळ, कविताताई सोळुंके, रोहिनीताई भोसले, सुदर्शन भोसले, पुजाताई वायचाळ, जयश्रीताई केंद्रे, माऊली कदम, किरण सोळंके, विठ्ठल घोगरे, गोपीनाथ नेजे, शाम ठाकूर, चेतन पंडित, प्रभाकर सातपुते, गणेश मिजगर, मारूती पोले, धनराज बीडगर तसेच समर्थ सेवेकरी परिवारातील शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कदम तर आभार चंद्रकांत सोळुंके यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED