रुमणा (जवळा) विविध कार्यकारी सोसायटी वर आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे वर्चस्व

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20जून):- तालुक्यातील रुमणा (ज.)येथील विविध कार्यकारी सोसायटी गुट्टे काका मित्र मंडळाने आपल्या ताब्यात ठेवत सहकार क्षेत्रात ही आपला दबदबा कायम ठेवला आहे.रुमणा येथील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या पण गुट्टे काका मित्र मंडळाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णा नामदेवराव सोळंके यांनी घडलेल्या प्रत्येक घडामोडीवर मात करत विजयाचा झेंडा फडकवला.

आमदार गुट्टेकाका मित्रमंडळाच्या शेतकरी विकास पॅनलचे दहा सदस्य विजयी झाले तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बळीराजा विकास पॅनलचे अवघे तिन सदस्य विजयी झाले.
शेतकरी विकास पॅनलला रुमणा येथील मतदारांनी भरघोस मताने निवडुन देत गुट्टे काका मित्र मंडळाच्या विधानसभा अध्यक्ष कृष्णाभाऊ सोळंके यांच्या नेतृत्वात शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आपल्या विजयाचा झेंडा रोवला. यात शेतकरी विकास पॅनलचे सर्व साधारण कर्जदार गटातुन कृष्णाभाऊ सोळंके. केशव रानबा निळे. दौलत बापुराव कोडगीर. वैजनाथ बाबुराव सोळंके. संतोष माणिकराव नरवाडे.

महीला सर्वसाधारण गटातुन मणिषा उद्धव सोळंके. पद्मिनबाई शिवाजीराव सोळंके. नागरीकाचामागास प्रवर्ग गटातुन अंगद शिवाजी गीरी. व मागासवर्गीय गटातुन भगवान गणपती गायकवाड विमुक्त जाती भटक्या गटातुन एकनाथ ज्ञानोबा वावगुडगे या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्मचारी एस. के पवार एस एस. शिंदे एन. पी. सोडगीर. पि एम वानखेडे. एस एम जाधव. राम कदम. एम. जी. कोरे. यांनी काम पाहिले तर या निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन स. पो. उ. नि. टि. टि. शिंदे.पोलिस कर्मचारी गोविंद कदम. पंचांगे. बिलापट्टे यानी चोख बंदोबस्त ठेवला होता..सर्व विजयी उमेदवारांनी निकाला नंतर सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले…..