महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव शाळेचे ” शासकिय चित्रकला स्पर्धेचा ” १०० % निकाल

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.21जून):- धरणगाव शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव शाळेतील विद्यार्थ्यांनी ” शासकिय चित्रकला स्पर्धेत ” घवघवीत यश संपादन केले.शासकीय चित्रकला स्पर्धेत शाळेतील ११ मुलांनी सहभाग नोंदवला होता. अकराच्या अकरा मुले हे उत्तीर्ण झाले असून शाळेचा चित्रकला स्पर्धेत १०० % निकाल लागलेला आहे.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी उत्तीर्ण मुला – मुलींचे अभिनंदन केले. मुलांच्या यशामागे शाळेतील कलाशिक्षक मा. हेमंत माळी सर यांचे मोठे योगदान होते. सरांचे पुष्पगुच्छ देऊन मनस्वी अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.पी.आर सोनवणे, पी.डी.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED