मानिनी महिला व बाल विकास संस्थेच्या संस्थापिका सौ. शुभांगी बल्लाळ यांना स्त्री कर्तुत्ववान आदिशक्ती पुरस्कार प्रदान

28

✒️मनोहर गोरगल्ले(खेड,विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.21जून):- येथील “कुसुमवात्सल्य फाऊंडेशन” वतीने दिला जाणारा आदिशक्ती पुरस्कार यावर्षी मानिनी महिला व बाल विकास संस्था राजगुरूनगर तसेच “हुतात्मा राजगुरू अकॅडमी” (पोलीस भरती पुर्व मार्गदर्शन केंद्र राजगुरूनगर) संस्थापिका सौ. शुभांगी बल्लाळ यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात “कुसुमवात्सल्य फाऊंडेशन” अध्यक्षा वैशाली पाटील यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या महिलांना कौतुकाची थाप आणि येथुन पुढे ही समाजकार्य करण्यास उत्साह वाटावा म्हणुन हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

त्यामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणा-या एकुण ५० महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राजगुरूनगर येथील सौ. शुभांगी बल्लाळ या हुतात्मा राजगुरू अकॅडमीच्या संस्थापिका असून तसेच मानिनी संस्था व मानिनी माहिला उदयोग समुहाच्या माध्यमातुन माहिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतात तसेच स्पर्धा परिक्षेकरीता युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे व चांगल्या वातावरणात अभ्यास करता यावा या करिता माफक दरामध्ये सुसज्ज अभ्यासिका सुरू केली आहे.

सौ. शुभांगी बल्लाळ करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवुन त्यांचा स्त्री कर्तुत्ववान आदिशक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द लेखक व व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर ( माईंड पॉवर ट्रेनर) होते त्यासोबत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सचिन ताम्हाणे, पोलिस उपनिरीक्षक अशोक टोके, गुन्हे शाखा महिला अधिकारी मनिषा तुळे, महिला पोलिस कर्मचारी सौ. सुधा टोके, अॅडव्होकेट प्रार्थना सदावर्ते , अॅडव्होकेट दिपाली अहिवळे- मोरे, अॅडव्होकेट जयश्री देवकाते – मारकड, तसेच पुणे व परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.