जागतिक योगादिनी मास्टर कुंदन पेंदोर सन्मानित

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)

गोंडपिंपरी(दि.21जून):- मागील तीन वर्षापासून तालुक्यातील विविध शाळेवर जाऊन निशुल्क योगा व कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणारे कराटे प्रशिक्षक मास्टर कुंदन पेंदोर यांचा जागतिक योगादिनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच तालुक्यातील कराटे स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

निर्झरा ग्रामीण बहुउद्देशीय संस्था गोंडपिपरी तथा झाडीबोली साहित्य मंडळ शाखा गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सविता कुळमेथे नगराध्यक्ष गोंडपिपरी होते. उद्घाटक समाधान भसारकर गटशिक्षणाधिकारी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्धव नारनवरे ज्येष्ठ साहित्यिक तसेच प्राचार्य प्रदीप बामनकर हे होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून योगाचे महत्त्व आणि कुंदन पेंदोर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रावीण प्राप्त केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण झगडकर यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. रमेश हुलके तर आभार रत्नाकर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक कुडे , सूनील फलके, गुरुदेव बाबनवाडे, संतोष उईके, रवींद्र कुळमेथे, अतूल जंपलवार बळीराज निकोडे यांनी परिश्रम घेतले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED