नाव्हलगांव विविध कार्यकारी सोसायटी वर आ.डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे वर्चस्व

88

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22जून):-पालम तालुक्यातील नाव्हलगांव येथील विविध कार्यकारी सोसायटीवर गुट्टे काका मित्र मंडळाने आपल्या ताब्यात ठेवत सहकार क्षेत्रात ही आपला दबदबा कायम ठेवला आहे.नाव्हलगांव येथील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या पण आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांचे अत्यंत विश्वासू बालासाहेब शिंदे (बाला पाटील) यांनी घडलेल्या प्रत्येक घडामोडीवर मात करत विजयाचा झेंडा फडकवला.आमदार गुट्टे काका मित्रमंडळाच्या शेतकरी विकास पॅनलचे १३ सदस्य विजयी झाले असून विरोधकांचा पुडता सुपडा साफ झाला आहे.

शेतकरी विकास पॅनलला नाव्हलगांव, आडगांव, कांदलगांव व नाव्हा येथील मतदारांनी भरघोस मताने निवडुन देत गुट्टे काका मित्र मंडळाचे बालासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार १०० पेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.

यात शेतकरी विकास पॅनलचे ढोले गोपीनाथ आबाजी, भंडारवाड अर्जून गणपती, भंडे मधुकर शंकरराव, शिंदे गणेश श्रीराम, शिंदे गोविंद शिवाजीराव, शिंदे जनार्धन भाऊराव, शिंदे पंढरी नारायण, शिंदे लिंबाजी पुरभाजी, शिंदे कमलबाई रामराव, शिंदे राजेश्री व्यंकटी, ब्याळे अनंत हनुमंतराव, कुगणे गजानन माधव, गुंडाळले सोनेराव चुडाजी सर्व विजयी उमेदवारांचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी स्वागत केले.याप्रसंगी जि.प. सदस्य गणेशराव दादा रोकडे, पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, मा. नगरसेवक असदुल्लाहखान पठाण, विश्वंभर बाबर, नाव्हलगावचे सरपंच बालासाहेब शिंदे,शेख गौस, कालिदास सूर्यवंशी, रोहिदास सूर्यवंशी, मन्नाथ शिंदे, कैलास सूर्यवंशी, रामेश्वर सूर्यवंशी, सलमान खान आदी उपस्थित होते.