माळी सेवा संघाचे मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे व त्यांच्या परिवाराकडून असिस्टंट बँक मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार

🔹जिद्द चिकाटी जोरावर शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.22जून):- मोहोळ तालुक्यातील अनगर गावांमधील शेतकरी कुटुंबातील आदित्य अंकुश नामदे वयाच्या २१व्या वर्षा पहिल्याच प्रयत्नात बनला पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर . आदित्य यांचं शिक्षण पाचवी ते दहावी कै शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथे झाले. अकरावी ते बारावी एस.पी.आय औरंगाबाद विद्यालय मध्ये झालं. शिक्षण चालू असताना पोस्ट ऑफिस मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाची परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील गुंजेगाव या ठिकाणी त्यांची पोस्टिंग करण्यात आलेली आहे.जिद्द असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. कारण मी लहान असताना आई-वडिलांचे रात्रंदिवस करणारे कष्ट पाहिल्यानंतर मनामध्ये विचार आला की आपण रात्रंदिवस मेहनत करून चांगल्या पदावर ती पोस्टिंग होऊन आई-वडिलांना सुख द्यायचं एवढाच मनामध्ये विचार होता.

आदित्यची पोस्ट ऑफिस मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून निवड झाली आहे हे कळल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहू लागले. कारण अत्यंत हलाखीच्या परिस्थिती दिवस काढून शिक्षणासाठी पैशाची कधीही उणीव भासू दिली नाही. आज त्या कष्टाचं चीज झालं.गरीब कुटुंबातील आणि शेतकऱ्याचा मुलगा पोस्ट ऑफिस मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर झाला म्हणून कळाल्यानंतर गावामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाला की माझे यशाच्या पाठीमागे माझे मार्गदर्शक आई-वडील,कै शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथील शिक्षक पवार सर चोपडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व वेळोवेळी मदत व सहकार्य, मार्गदर्शन करणारे आमचे मामाश्री भाऊराव वसेकर, महेश वसेकर व आमचे बधु अतुल ननवरे

माळी सेवा संघाचे मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे व परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माळी सेवा संघ मोहोळ तालुका कार्याध्यक्ष अक्षय भानवसे, महेश वसेकर, दिगंबर फुलसागर, सुनिल वसेकर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आभार राहुल ननवरे यांनी मानले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED