घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप

🔸छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

बुधवारी २२ जून रोजी घुग्घुस येथील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे स्नेहभेट देण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

घुग्घुस येथील आठवडी बाजार परिसरातील अनेक भाजीपाला व फळ विक्रेत्यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मोफत प्रत्येकी एक पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले देशातील किरकोळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नेहमी गोरगरिबांच्या सेवेत असतात. यापूर्वी त्यांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक कार्यक्रम राबवले. छत्री, रेनकोट, नोटबुक वाटप असो अथवा कोरोना मध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य किट, स्यानीटायझर, मास्क वाटप असो भाऊ नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येतात.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, तुलसीदास ढवस, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, मधुकर धांडे, नितीन काळे, शाम आगदारी, महेश लठ्ठा, विक्की सारसर, निरंजन डंभारे, राकेश भेदोळकर, निरंजन नगराळे, सतीश कामतवार, उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED