आय टी आय व डिप्लोमा(पॉलीटेक्नीक) ची प्रवेश प्रक्रिया सुरु

🔸आय टी आय साठी २०,६५६ जागा तर तंत्रनिकेतन साठी १५,०४० जागा उपलब्ध

🔹पात्र विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनानेच प्रवेश प्रक्रिया करावी – विश्वजीत मुंडे

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.23जून):-शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आधार कार्ड, दहावी गुणपत्रक मोबाईल नंबर, ई-मेल आयडी विद्यार्थ्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ जूनपासून व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करता येणार आहेत. यंदा मराठवाड्यातील १३७ संस्थांमधून २०६५६ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशासाठी एका विद्यार्थ्याने एकच अर्ज भरावा, एका पेक्षा जास्त अर्ज भरल्यास विद्यार्थ्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच तंत्रशिक्षण संचानालयामार्फत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रथम व बारावी,आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तंत्रनिकेतन मध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येईल.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी (दहावी नंतरचे) पदिवका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी साठी ३० जुन २०२२ अंतिम मुदत देण्यात आली आहे तसेच पोस्ट HSC (बारावी नंतरचे) डी. फार्मसी साठी ०८ जुलै २०२२ ही अंतिम मदत देण्यात आली आहे. पदविका अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग व महाराष्ट्र राज्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क ४००/- तर फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC,SBC, EWS] आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३००/- रु. नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. वर्षीची तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी पैकी एका सुविधेचा लाभ घेता येईल. तेव्हा विद्यार्थ्यांनी व पालकांनी वरील दोन्हीही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी आपल्या परळीतील एकमेव सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र विश्वजीत मुंडे ९१५८३६३२७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED