डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी एकसंघ भारतासाठी दिलेले बलिदान सदैव प्रेरणादायी! – देवराव भोंगळे

🔸मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना बलिदान दिनी अभिवादन

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक, थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी देवराव भोंगळे म्हणाले, जनसंघाचे संस्थापक प्रमुख डॉ. श्यामाप्रसाद मूखर्जी यांनी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत एकसंघ आहे आणि कश्मीर हे भारताचे महत्वपूर्ण अंग आहे. त्यामुळे एक देश में दो प्रधान, दो विधान और दो निशान नहीं चलेंगे असा नारा दिला. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ भारताचे स्वप्न पाहून ते पुर्ण करण्‍यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट घेतले.

डॉ. मुखर्जींनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नपूर्तीसाठी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अन्यायकारक ३७० कलम खारीज करून कश्मीरला संपुर्ण राज्याचा दर्जा दिला. आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्याचे काम केले. पुढे बोलताना, केवळ ५३ वर्ष आयुष्यं लाभलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळेचं आज भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने योग्य मार्गक्रमण करत आहे. निस्सीम देशभक्त डॉ. श्यामाप्रसादजींचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जिल्ह्यात अनेक बूथवर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.

याप्रसंगी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पं. स. सभापती निरिक्षण तांड्रा, संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, राजेश मोरपाका, श्याम आगदारी, सुरेंद्र जोगी, रत्नेश सिंग, राजू डाकुर, विनोद जंजर्ला, चंदू पलावाला, अरुण रामेल, विनोद नीचकोला, राजू बोड्ड सौ. सुनंदाताई लीहितकर, निशाताई उरकुडे, लता आवारी, शीतल कामतवार, स्वाती  गंगाधारे, भारती पर्ते, खुशबू मेश्राम नेहा कुम्मरवार यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED