आर्थिक गुन्हेगारांच्या चलाखीला रोखण्यासाठी सतर्कता बाळगा : पो .अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन,.

27

✒️जिल्हा, प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.23जून):- नाशिक जिल्ह्यात परराज्यातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीची भामटी , चतुर मंडळी नागरिकांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत असून कुठल्याही अनोळखी फोनला अथवा साधा एस एम एस व्हाट्सअप एस एम एस किंवा कुठल्याही लिंकला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन ग्रामिण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्हा वासियांना केले आहे . या संदर्भात नागरिकांना सजगतेचा इशारा देतांना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आवाहन केले की , वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘ एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे .

नुकतेच काही शहरात बनावट ‘ एसएमएस पाठवून ऑनलाईनद्वारे लुबाडल्याचा प्रकार घडत आहे . यासोबतच महावितरणकडून देखील बनावट ‘ एसएमएस ‘ प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत . त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘ एसएमएस ना कोणताही प्रतिसाद देऊ नये . मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे . त्या करीता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा , असे बनावट ‘ एसएमएस ‘ नागरिकांना पाठवून ग्राहकांचे बँक खाते साफ करण्याचे प्रकार घडत आहेत . या गुन्हेगारांची आर्थिक आणखी दुसरी एक मोडस ऑपरेडी असून कर्ज देण्याच्या बहाण्याने ग्राहकांशी व्यक्तिगत मोबाईलवर संपर्क साधला जातो , किंवा एखादी लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगून आपल्या मोबाईलचा एक्सेस त्यांच्याकडे घेतला जातो .

आपल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व गोपनीय माहितीवर , संबंधित अॅप्सवर नियंत्रण मिळवून आपले बँक खात्यावर असलेली सर्व रक्कम त्यांच्याकडे वळवून घेतात . असे प्रकार ठिकठिकाणी घडत असून अशा कुठल्याही अनामिक , अनोळखी फोन किंवा लिंक , अथवा मेसेजकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे आपल्या बँक खात्याविषयी कुठलीही माहिती , पासवर्ड शेअर करू नयेत . याही पलीकडे जाऊन दुर्दैवाने अशी फसवणूक झालीच तर गोल्डन अवर्स मध्ये आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे .