ऊसतोड मजूराचे अपहरण करून मुकादमाकडून पती व पत्नीला विष पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न

🔹गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथील घटना

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.23जून):-मध्ये ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोगलगाव येथील ऊसतोड मजूर पतीला मुकादमासह दोघांनी मिळून बेदम मारहाण करून व पत्नीला विष पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न ही धक्कादायक घटना तालुक्यातील भोगलगाव येथे दि, २२ रोजी सांयकाळी ५ च्या सुमारास घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, भोगलगाव येथील ऊसतोड मुकादम कृष्णा पवार यांनी उसतोड मजूर शिवाजी पवार यांना ऊसतोडणीसाठी दीड लाख रुपये दिले होते, परंतु त्यांचे ऊसतोडणीला जाण्याचे रद्द झाले होते. ऊसतोडणीला जाण्याचे रद्द का केले म्हणून मुकादमाने मुद्दाम दोन लाखाची मागणी करून पती शिवाजी पवार यांना मुकादमासह अन्य दोघांनी मिळून बेदम मारहाण केली आहे व पत्नी सविता शिवाजी पवार यांना चार ते पाच महिलांनी मिळून विष पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. दोघा दांपत्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भोगलगाव येथे घडली आहे.

या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी फिर्याद घेण्यासाठी उपजिल्हा रूग्णालया गेवराई येथे रूग्णांना संपर्क केला असता आमची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जॉब देऊ शकत नाही असे सांगितले आहे.सदर पती व पत्नीला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय गेवराई येथून जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी गौरी हॉस्पिटल बीड येथे हलविण्यात आले आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED