


✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)
गेवराई(दि.23जून):-गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील राशन दुकानदार बुद्दभूषण वक्ते याला दि १६/०६/२०२२ गुरुवार रोजी ३:३० वाजेच्या सुमारास सिरसदेवी फाटा येथून गावात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सेतू सुविधा केंद्र समोर शाम अडागळे हे उभे असताना त्यांनी राशन दुकानदार बुध्दभूषण वक्ते फोन केला व विचारले की तू राशन कधी माझे देतोस व तुला शासनाचे नियम माहिती आहे.
का असे विचारले व या राशन चोरानी सांगितले की मला शासनाचे नियम माहिती नाही असे म्हणाला व सिरसदेवी फाटा येथे राशन चोर बुध्दभूषण वक्ते ,अभय कल्याण वक्ते,समाधान कचरू वक्ते, सचिन कचरू वक्ते,दादा महादेव वक्ते,भागवत राजेंद्र वक्ते हे अडागळे यांच्याकडे आले व तुला कशाचे राशन देयचे तू तर आमचे राशन चे गव्हाचे कट्टे देताना व्हिडिओ व्हायरल करतोस असे म्हणत शाम अडागळे यांना जिवे मारण्याची धमकी देत गजाने,लाकडी दांड्याने, बेल्टने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून अडागळे यान गंभीर जखमी केले व त्यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल व रोख ५००० घेऊन गेले या प्रकरणी अडागळे यांनी तलवाडा पोलीस स्टेशन येथे सचिन वक्ते सह पाच जनावर गुन्हा दाखल केला आहे.




