साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

37

✒️मनोहर गोरगल्ले(खेड तालुका प्रतिनिधी)

खेड(दि.24जून):/आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त सहज योग आत्मसाक्षात्कार सोहळा साने गुरुजी विद्यालयात खरपुडी तालुका खेड जिल्हा पुणे संपन्न झाला. त्यानिमित्ताने सहज योग आत्मसाक्षात्कार परिवारातर्फे श्री भरत जाधव सर, सौ सुनीता वाळुंज ,सौ रितू पटेल , कुमारी तेजस्विनी शेळके यांनी योगासन, ध्यान प्राणायाम, महत्व व फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमा निमित्ताने खेड तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष श्री अनिल शेठ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की दररोज योगा केल्याने शरीर तंदुरुस्त रहाते व आपण जास्त प्रमाणात आजारी पडत नाही. साने गुरुजी विद्यालय खरपुडी तालुका खेड जिल्हा पुणे चे मुख्याध्यापक श्री रवींद्र चौधरी पाटील यांनी मुलांना योगासने केल्याचे फायदे सांगितले. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन विद्यालयाच्या सर्व स्टाफनी व्यवस्थित केले होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विष्णू काळे सर यांनी केले.