येळंब बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील आक्रोश ठिय्या आंदोलन यशस्वी ; वरिष्ठांकडुन तात्काळ बैठक

30

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.24जून):-तालुक्यातील येळंब (घाट) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कामकाज सुरळीत सुरू करण्यासह इतर मागण्या घेऊन आज आक्रोश ठिय्या आंदोलनाची सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि पत्रकार अशोक काळकुटे यांनी हाक दिली होती. यामध्ये शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शाखाधिकारी, कॅशिअर आणि काही कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, शाखेतील सर्व अधिकारी, कर्मचारी कामकाजाच्या वेळेत पुर्णवेळ हजर ठेवावेत , तांत्रिक अडचण दाखवून संपूर्ण कामकाज यापुढे बंद ठेवू नये, पैसे भरून घेणे आणि काढणे यासाठी कुठलेही ठोस कारण दिल्याशिवाय कॅश काऊंटर बंद ठेवू नये, किरकोळ कामासाठी १८० रूपये चार्ज आकारणी बंद करावी, एज्युकेशन लोन विद्यार्थ्यांना तात्काळ मंजूर करून द्यावेत, जे शेतकरी रेगुलर आहेत किंवा नवीन आहेत अशा शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे, सर्व महामंडळाचे दिलेले टार्गेट पुर्ण करुन युवकांना नवीन व्यवसायासाठी आर्थिक भांडवल द्यावे, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही त्यांना ग्राहकांशी थेट संबंध न ठेवता कार्यालयीन कामे द्यावेत किंवा बदली करावी, ए.टी.एम सेवा सुरळीत सुरू करावी, शाखेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. कसलाही गुन्हा दाखल करण्याची धमकी किंवा अरेरावीची भाषा करु नये अशा मागण्या करण्यात आल्या. सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बॅंकेच्या बीड येथील उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, पत्रकार अशोक काळकुटे, मा.पं.स सदस्य बी.एस कदम, ग्रां.पं सदस्य विकास आबा कदम, पत्रकार सुरेश पाटोळे, डॉ.अमर कदम, युवा उद्योजक नितीन ढाणे, ग्रां.पं सदस्य सेवानंद कदम, जम्मील शेख, प्रमोद कांबळे, राजेंद्र वाघ, मिस्कीन फौजी, सतीश कदम, पांडुरंग कदम, सुशिल कदम, अजय मुळे शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी काही मागण्या मान्य केल्या असुन तात्काळ बैठक घेऊन कामकाज सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तर येत्या एक महिन्यात आमच्या उर्वरित सर्व मागण्या मान्य न केल्यास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.