भाजप – सेना सरकार स्थापन होऊन कार्यसम्राट आ. लक्ष्मण पवार मंत्रीपद मिळावे म्हणून रामेश्वर मस्के यांचे आई त्वरितादेवीला साकडे

28

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.24जून):-महाराष्ट्र राज्यात सेनेचे आमदार महा विकास आघाडी सरकार मधुन फुटून मा.ना. एकनाथरावजी शिंदे गट स्थापन केला आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेना – भाजप सरकार नव्याने स्थापन व्हावे व त्या सरकार मध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल, कार्यसम्राट आमदार अॅड. लक्ष्मणराव माधवराव पवार यांना कॅबिनेट मंत्री व बीडचे पालकमंत्री पद मिळावे म्हणून यासाठी गेवराई तालुक्यातील भोगलगांवचे कट्टर लक्ष्मण सैनिक – रामेश्वर मस्के यांनी नवसाला पावणारी तलवाड्याची आई त्वरितादेवीला साकडे घातले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, बिड जिल्ह्यातील राजकारणातला देव माणुस, सच्चा व प्रमाणिक कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल, कार्यसम्राट आमदार अॅड. लक्ष्मणराव माधवराव पवार यांना भविष्यात मंत्री मंडळात मंत्री म्हणून पदावर विराजमान केल्यास संबंध बिडजिल्याचा सर्वांगीण विकास झाल्या शिवाय रहाणार नाही आणि सर्वसामान्यांचा हक्काचा मंत्री म्हणून कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव माधवराव पवार यांच्या कडे पाहिले जाईल, सर्व सामान्य वाडी, वस्ती, तांड्यांवरील जनतेला न्याय मिळाल्या शिवाय रहाणार नाही. महाराष्ट्रातील पहिला आमदार आहे की जो जनतेसाठी गोदावरी नदीच्या पात्रात पाण्यामध्ये सलग सहा ते सात तास उभा राहून जलसमाधी आंदोलन करणारे कार्यसम्राट आमदार अॅड लक्ष्मण पवार यांची ओळख आहे.

त्यांनी आज पर्यंत त्यांच्या आमदारकीच्या सात ते आठ वर्षांच्या काळात गेवराई तालुक्यातील गांवा – गांवातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण जाळे निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्याच बरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यास ही आघाडीवर आहेत. त्यामुळेच संबंध बिडजिल्याच्या विकासासाठी सर्व समावेशक म्हणून भाजप – शिवसेना सरकार स्थापन व्हावे आणि झाल्यास सरकार मध्ये बिडचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून आमदार अॅड लक्ष्मणराव माधवराव पवार यांची निवड करावी म्हणून भोगलगांवचे कट्टर लक्ष्मण सैनिक – रामेश्वर मस्के यांनी नवसाला पावणारी तलवाड्याची आई त्वरितादेवीला साकडे घातले आहे.