टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याची निवडणूक जाहीर

27

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.25जून):- मोहोळ तालुक्यातील टाकळी शिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 24 जून रोजी जाहीर झाली आहे आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होत असून 31 जुलै 2022 रोजी मतदान तर 1 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आले निर्णय अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था कुंदन भोळे यांनी सांगितले. भीमा कारखान्याच्या निवडणुकीची सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक राजेंद्रकुमार दर्डा यांनी सहा जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन गोळी यांनी आज 24 जून रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला असून यामध्ये 24 ते 30 जून दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालय उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले दाखल झालेल्या अर्जाची छाननी एक जुलै रोजी होणार आहे. वैद्य नामनिर्देशन पत्राचा यादी चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्धी केली जाणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चार ते 18 जुलै या दरम्यान मुदत देण्यात आली आहे निवडणूक लढवणाऱ्या अंतिम वधू वरची यादी व निवडणूक चिन्हाची वाटप 19 जुलै रोजी सकाळी केले जाणार असल्याचे सांगितले भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मतदान आवश्यक असल्यास 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजता ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे तर १ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असल्याचे कुंदन भोळे आणि सांगितले.

भीमा परिवाराची रविवारी बैठक भीमा परिवाराच्यावतीने चेअरमन तथा खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची चर्चा व विचारविनिमय करून उमेदवार ठरविण्यासाठी रविवारी 26 जून रोजी सकाळी दहा वाजता पुळुज येथील महाडिक शेड या फार्म हाऊस बैठक होणार असल्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी उपाध्यक्ष सतीश जगताप यांचा अर्ज 24 जून रोजी पहिल्याच दिवशी भीमा परिवाराच्यावतीने व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांनी आपल्या एकूण द्वारे अर्ज कुंदन भोळे यांच्याकडे दाखल केला आहे त्यावेळी भीमाचे संचालक तुषार चव्हाण भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश अवताडे युवराज चौगुले उत्तम बाबर तानाजी जगताप आदींची उपस्थिती होती तसेच पहिल्या दिवशी 64 अर्जाची विक्री झाल्याचे सहाय्यक निबंधक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांनी सांगितले