फुटीर आमदारांमध्ये चलबिचल, कमालीची अस्वस्थता; दिवस लांबताहेत तसा संयम सुटत चाललाय, धीर खचतोय, गुवाहाटीत जोरदार अंतर्गत वादावादी!

63

✒️जगदीश का. काशिकर(मो:-९७६८४२५७५७)

मुंबई(दि.25जून):- गुवाहाटीत पळून गेलेल्या फुटीर आमदारांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आणि चलबिचल आहे. दिवस जाताहेत तसा अनेकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळेच फुटीर गटाचे म्होरक्या असलेले एकनाथ शिंदे यांना वारंवार संयमाचे आवाहन करावे लागत आहे. मतदार संघातील वाढत्या असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. “आम्ही इथे काय अवस्थेत जगतोय आणि तुम्ही तिकडे मजा मारताय,” असे प्रश्न कुटुंबियांकडून विचारले जात असल्याने फुटीर नेते चिंताग्रस्त झाले आहेत.

काही लोकांनी स्वत:ला चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी आपली दिशाभूल केली, अर्धवट माहिती दिली, आपल्याला फसविले गेले, वापरले जात आहे, ही भावना फुटीर आमदारांमध्ये वाढत चालली आहे. मतदारसंघात वाढता विरोध, आक्रमक झालेले सर्वसामान्य शिवसैनिक, जागोजागी गद्दारीचा निषेध, विष्ठा खाल्ल्याचे आरोप, कार्यालयावर हल्ले, पुतळा दहन… त्यातच पद राहील की जाईल, हा संभ्रम. आता हे सारे नेमके केव्हा संपेल याबाबत कमालीची अनिश्चितता या सर्वांमुळे फुटीर आमदारांत याच वैफल्यातून काल रात्री गुवाहाटीत जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

“हे सारे केव्हा संपेल,” या फुटीरांच्या प्रश्नावर म्होरक्याकडे नेमके व निश्चित उत्तर नाही. “सगळे सुरळीत होईल, घाबरु नका, आपलेच सरकार येईल,” या म्होरक्याच्या कोरड्या व फुसक्या उत्तरावर फुटीर आमदारांचे समाधान होत नाहीये. आता पद राहिलेच तर “प्रहार”सोबत जाऊन बसायचे का मग? हा हतबल प्रश्न फुटीर उपस्थित करीत आहेत. आपला स्वतंत्र गट आणि तीच खरी शिवसेना राहील, हे दाखवलेले स्वप्नही फुसकाट ठरताना दिसत असल्याने फुटीर आमदारांमध्ये असंतोष उफाळू लागला आहे. त्यातच महाशक्ती कुठेही नेमकेपणाने मैदानात दिसत नाही. कायदेशीर लढाई लांबतांना दिसताच महाशक्तीने हात वर केल्याच्या भावनेने फुटीर आमदार आणखी धास्तावले आहेत. त्यातील एकाने प्रश्न केला, “राज्यपालांना कोरोना लागण झाली व ते राजभवनाबाहेर गेले, तेव्हाच काहीतरी गडबड आहे, हे एव्हढे सोपे नाही हे जाणवले. तुम्ही आम्हाला सत्य का सांगत नाही. काय लपवत आहात, नेमके काय होणार आहे आमचे आता?”

48 ते 72 तासात सारे आटोपून आपले नवे सरकार महाशक्तीसह सत्तेत येईल, असे फुटीर आमदारांना आधी सांगितले गेले होते. सुरतेतूनच दुसऱ्याच दिवशी मुंबईत आणून राज्यपालांसमोर जाऊन परेड केली जाईल, निर्धास्त राहा, असे फुटीर आमदारांना सांगितले गेले होते. अगदी गरज लागलीच तर, काही आकस्मिक प्रसंग उद्भवला तर प्लान बी म्हणून गोव्यात किंवा कर्नाटकात नेण्याचा विचार होता. मात्र, ऐनवेळी फुटीर आमदारांना रातोरात महाशक्तीचा बालेकिल्ला असलेल्या सुरतेहून आसामात हलविण्यात आले. तेथे आधीच बुकिंग करण्यात आले होते वैगेरे सर्व बातम्या प्राईस टॅग लावलेल्या गोदी मीडियाला हाताशी धरून पेरण्यात आल्या. प्रत्यक्षात हे पाऊल अचानक, नाईलाजास्तव उचलावे लागले. कारण फुटीर आमदार अचानक रातोरात आल्याने गुवाहाटीतील हॉटेलला दुसऱ्या दिवसापासूनची अनेक इतर ग्राहकांचे बुकिंग रद्द करावे लागल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक ग्राहकांचे ऑनलाईन बुकींग असल्याने त्यांना ऑनलाईन रिफंड अदा केला गेला आहे. काही प्रमुख पर्यटक कंपन्यांचे ग्रुप बुकिंग कॅन्सल करावे लागले आहे. त्यामुळे आसाम बुकिंग हे पूर्वनियोजित असल्याचा गोदी मीडियामार्फत पसरवलेला प्रचार तद्दन फोल आहे. गोदी मीडिया सत्य दडपून दिशाभूल करणाऱ्या बातम्या दाखवत असले तरी सोशल मीडियातून सत्य जनतेसमोर येत आहे.

फुटीर शिवसेना गटाकडे 37 आमदार नाहीत किंवा तशी त्यांना खात्री नाही, त्यामुळेच हे मुंबईत येण्याचे इतके दिवस टाळले आणि आता कायदेशीर, तांत्रिक पेचात अडकवून फुटीचा “कात्रजचा घाट” झाला आहे. पंटर आणि चेले-चपाटे, ठेकेदार, कंत्राटदार आणि लाभार्थी कार्यकर्ते फक्त फुटिरांचे समर्थन करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला आहे. दापोलीतील सर्वसामान्य शिवसैनिकांनी लाभार्थी, पदाधिकारी यांचा स्थानिक पक्ष हा फुटीर योगेश कदम यांच्या पाठीशी असल्याचा दावा खोडून काढत आपण गद्दाराच्या नव्हे तर शिवसेनेच्या पाठीशी आहोत, असे स्पष्ट केले आहे. हेच जागोजागी घडत आहे आता. पुण्यासारख्या सेनेची कमी ताकद असलेल्या भागात JSPM हे शैक्षणिक संस्थान चालविणाऱ्या मराठवाड्यातील फुटीर तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले आहे.

याच मुद्द्यावरून काही फुटीर आमदारांनी काल रात्री फुटिरांच्या म्होरक्याच्या खास माणसांशी हुज्जत घालून जोरदार वादावादी केली. “आम्हाला फक्त 2 दिवसांचा खेळ आणि सुरतेहून मुंबई राज्यपालांसमोर सांगितले आणि आता इथे आसामात आणून टाकलंय. तिकडे आमच्या बायका-पोरांना जगणं मुश्कील झालंय आणि तुमचा काय टाईमपास चाललाय? होत नसेल, तुमच्या बसकी बात नसेल तर सांगा, जातो आम्ही परत, उद्धवसाहेबांची माफी मागतो तिकडे जाऊन. इथे आहे ती आमदारकी जायची वेळ आली आहे,” अशा शब्दात बाचाबाची झाली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण सोडविले गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यातच आसामचे मुख्यमंत्री कितीही पर्यटनाला या सांगत असले तरी फुटीर आमदार पर्यटनाच्या मन:स्थितीत नाहीत.

त्यांना फोन जमा करून गटाने सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत फिरायला जायची, पर्यटनाची परवानगी आहे. मात्र, पुराने व महागाईने वैतागलेले स्थानिक नागरिक, तृणमूल कार्यकर्ते, बंडखोर व नक्षलवादी गट यांच्याकडून हल्ला होण्याची, मारहाणीची भीती असल्याने फुटीर आमदार बाहेर पडायला घाबरत आहेत. हॉटेलातील चार भिंती कितीही पंचतारांकित असल्या तरी चार दिवस त्या भिंतीत डांबले जाऊन फुटीर आमदारांचा जीव आता गुदमरायला लागला आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर फुटिरांविरोधात असंतोष, नाराजी, राग वाढत चालला आहे. गुवाहाटीतील हॉटेलवरच आता हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक महाशक्तीने लवकरात लवकर फुटिरांना इथून हलवा, अशी विनंती वरिष्ठांकडे केली आहे.

*न्यायालयीन, तांत्रिक लांबवालांबवीने फुटीर आमदार कमालीचे वैफल्यग्रस्त*

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या कालच्या आक्रमक पावित्र्यानंतर तर फुटीर आमदारांचे धाबे दणाणले आहे. शरद पवारांनीही मैदानात उडी घेतली आहे. सर्वांनी खुले आव्हान दिल्यानंतर आता फुटीर आमदार कमालीचे संभ्रमात आहेत. महाशक्ती कुठेही पुढे यायला तयार नसल्याने फुटीर आमदार मानसिक द्विधा मन:स्थितीत आले आहेत. त्यामुळेच आता मी शिवसेनेतच, अशी वेळ का आली, वैगेरे भावनिक सारवासारवीचे व्हिडिओ आता गोदी मीडियाला हाताशी धरून पेरला जात आहे. न्यायालयीन लढाईत आपण दाखविले जातो, तितके सरस नाही; आपण कमजोर आहोत, ही भावना आता फुटीर आमदारांमध्ये आहे. त्यातच महाशक्तीच्या वरिष्ठ नेतृत्वाने कोकणातील एका नेत्याला सडकछाप वक्तव्याबाबत तंबी देऊन गप्प राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. इतरही भाजपाच्या बोलक्या पोपटांना तोंड बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश आहेत. दिल्लीहून अजूनही मामुंना ग्रीन सिग्नल मिळत नाहीये. त्यातच पुण्याचे जावईही तूर्तास मामुंच्या उतावीळ व आग्रही भूमिकेला अनुकूल नाहीत. रोड सम्राटही त्यांना अनुकूल नाहीत. शिवसेनेबाबत महाराष्ट्रातील जनतेचे एक राजकारणापलीकडचे भावनिक नाते आहे. सत्ता आलटापालट वैगेरे ठीक आहे; शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रहार करण्याचे प्रयत्न कोकणी माणसाला, मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला मुळीच रुचणार नाहीत. याचा फटका आगामी मुंबई महापालिका व इतर निवडणुकात बसू शकतो. शिवसेनेला सहानुभूती लाभल्यास इतरही निवडणुकात फटका बसण्याची महाशक्तीला भीती आहे. गुजरात दंगलीतील कलंक नुकताच धुवून निघालाय. शिवाय, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान कुठलाही नवा कलंक, घोडेबाजाराचे आरोप महाशक्तिला नको आहे. देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये व जनमानसात चुकीच्या कृतीने वा पाठिंब्याने भाजपाविरोधी नाराजी झाल्यास मिशन 2024 ला धक्का लागू शकतो.

प्रादेशिक व विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाला बळ देणारा निर्णय आपण घेऊ नये, असे मत मांडणारा मोठा गट महाशक्तित आहे. इतके फुटीर आपल्याकडे घेऊन ही डोकेदुखी कुठे पुढे सांभाळत बसायचे, आपल्या चौकशा आणि भ्रष्टाचारविरोधातील लढाया यांचे काय करायचे मग, हेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेले काही दिवस उपहास व निंदा या सायबरहल्ल्याला तोंड देत पक्ष प्रतिमा, स्वच्छ धोरण याचा युक्तीवाद करणे कठीण होत असल्याने महाशक्तीचा सायबर सेलही अलिप्त राहण्याच्या भूमिकेवर आग्रही आहे. याहीपलीकडे, महाशक्तीतील एका मोठ्या गटाला मामुला तोंडघशी पाडायचे आहे. तूर्तास हे महाशक्तीचे केंद्रीय नेतृत्वही जाणून आहे. फुटिरांच्या गटात 37 शिवसेनेचे नक्की आहेत का, असले तर मुंबईत आल्यावर, सभागृहातील परिक्षेत ते टिकणार का? हे प्रश्न त्यांनाही आहेतच. अर्थात या सर्व सध्याच्या महाशक्तीच्या भूमिका आहेत. मामु पटवायला जोरात कामात लागले आहेत. कदाचित बैठकांचे सत्र, मामुंचा फारच आग्रह असेल तर कदाचित पडद्याआडून खेळणारी महाशक्ती मैदानात उतरेलही; पण किचकट तांत्रिक प्रक्रिया, कायदेशीर लढाया यांचे काय? बरेच दिवस तर लागणारच आणखी. आता हे *सायकॉलॉजीकल बॅटल* आहे. दिवस जाणार, न्यायालयीन व तांत्रिक प्रक्रिया लांबवत नेऊन फुटिरांना हैराण केले जाणार, निराशेच्या गर्तेत ओढले जाणार… त्यात अंडरपँटही सोबत न घेऊन गेलेले फुटीर आमदार इकडे मतदारसंघात नागडे होऊ लागले आहेत. पंचतारांकित असला तरी कोंडवाडाच, त्या कोंडवाड्यात आणखी किती दिवस धीर धरणार, संयम ठेवून राहणार फुटीर आमदार? बरं इतकं सारं करून हाती काय येणार? धुपाटणे तर नाही ना? नशिबी महाशक्तीही नसेल आणि भलत्याच ठिकाणी “प्रहार” करत विलीन व्हावे लागले तर? निष्ठाही गेली आणि नशिबी विष्टा आली. एक म्हण आहे ना आपल्याकडे……..धोबी का कुत्ता