महाराष्ट्राचे कृषिमंत्री गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलवर ; आमदार देवेंद्र भुयार पेरणीच्या औतावर….

39

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतात धरले औत ; शेतात जाऊन केली पेरणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.25जून):-आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट शेतात जात पेरणीसाठी सारे फाडण्याकरिता औत हाती घेतले अन लगेचच पेरणीला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी होत असतांना विविध आमदार मुंबई किंवा बाहेर राज्यात असतांना थेट आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये जाऊन शेतात औत धरल्याचे बघून परिसरातील शेतकऱ्यांना सुखद धक्काच बसला. आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा असे आवाहन करीत शासन शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. आज शेतामध्ये जाऊन शेतामध्ये बैल जोडीच्या सहाय्याने काकण,सारे फाडून बियाण्यांची पेरणी केली. लोकांच्या दुखा:त आणि सुखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. चांगला पाऊस पडावा अन् बळीराजा सुखी,समृद्धी व्हावा असं साकडं विठ्ठलालाला घातलं.पावसाची समाधानकारक झालेली सुरूवात.

त्यामुळे शेतकरी खुप मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीला लागला आहे. विविध संकटांमुळे शेती व्यवसायात अडचणी जाणवत आहेत. अशा परिस्थितीत सगळीकडे शेती कामाला गती आली आहे. शेती हा आपल्या देशाचा पाया असून शेतीमुळेच आपला देश अन्न-धान्याच्या बाबतीत स्वंयपुर्ण बनला आहे.त्यामुळे जमेल त्या पध्दतीने युवकांनी शेतीकडे देखील लक्ष देऊन घरच्यांना मदत करायला हवी व शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवायला हवा, असा विचार आमदार देवेंद्र भुयार नेहमीच व्यक्त करत असतात. या विचाराला स्वत: पेरणी करुन ते आचारणात आणतात हे देखील या निमित्ताने दिसले.