राजुरा येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

✒️सय्यद शब्बीर जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)

राजुरा(दि.25जून):- राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त छावा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित प्रबोधन व 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 28/06/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता छञपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.समीर कदम असतील.

या प्रबोधनाच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या महापुरुषांच्या संघर्षमय जीवनातून नवचैतन्य, आत्मविश्‍वास आणि साक्षात्कार प्राप्त होईल, जेणेकरून येणाऱ्या काळात ते महापुरुषांचे बलिदान आणि परिवर्तनवादी विचारधारा आत्मसात करून भविष्यात आणि वर्तमानात प्रगती करतील. . असे प्रतिपादन छावा फाऊंडेशनचे ज्येष्ठ सल्लागार अमोल राऊत यांनी व्यक्त केले. या प्रबोधनपर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छावा फाऊंडेशन राजुरातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED