सातपूर भागात अशोक नगर परीसरात एटीएम मशीन फोडताच बँकेला काॅल, पोलिसांच्या सर्तकतेने दोन परप्राऺतिय जेरबंद

🔹एटीएम फोडले,रक्कम काढण्यात अपयश

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.26जून):-सातपुर परीसरात महादेव वाडी येथे दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील आलेल्या सराईत गुन्हेगारांनी अशोक नगर परीसरात युनियन बँकेची एटीएम केंद्रात तीन मशीन फोडताच बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात काॅल गेला असता बँकेने त्वरीत सातपूर पोलिसांना माहिती दिल्यानं पोलीसांनी सातपूर परीसरात हालचाली वरुन दोघांना ताब्यात घेतले या‌ संशयित दोन गुन्हेगारानी पोलिसांना एटिम फोडण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले सदरहू घटनेत एटीएम मशीन मधील रक्कम काढण्यात चोरट्यांना अपयश आले.शनिवार दिनांक २५च्या पहाटे ४;३० वाजेच्या आसपास ही घटना घडली आहे.

सातपुरच्या अशोकनगर परीसरात युनियन बँकेची एटीएम केंद्रात तीन मशीन आहेत शनिवारी रात्री परप्रांतिय सराईत गुन्हेगारांनी एटीएम केंद्रात प्रवेश करुन तीनही मशीन फोडताच बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात काॅल गेला तेथील कर्मचारी यांनी त्वरीत सातपूर पोलिसांना माहिती दिली पोलिस येईपर्यंत चोरट्यांनी तेथुन मोर्चा पपया नर्शरीजवळील बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएम केंद्रात प्रवेश करुन मशीन फोडुन रक्कम काढण्यात अपयश आले त्यामुळे बाहेर निघून सातपूर कडे जात असताना पोलिस त्यांच्या शोधात जात असताना संशयितांना हालचाली वरुन सातपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार संजय शिंदे,शरद झोले, अनंता महाले, संभाजी जाधव यांच्या पथकाने दोघांना ताब्यात आहे.

एटीम मशीन फोडल्याप्रकरणी सनी राजेश कुशवाह वय वर्ष १९,श्रीराम गोरेलाल गौतम वय वर्ष १९, अशु रमेश कुशवाह वय वर्ष २४, सर्व रहाणार करबीगवा तालुका नखल जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश,तर अभिषेक धनराज सिंग चौहान वय वर्ष ३० रहाणार फरसदेपुर तालुका बिदकी जिल्हा फत्तेपुर उतर प्रदेश, यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED