स्विमिंग पूल मध्ये 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26जून):-नगर परिषदेच्या अधिनस्त असलेल्या स्विमिंग पूल मध्ये आपल्या मित्रा सोबत पोहण्यासाठी गेलेल्या मो. बिलाल शेख मुनाफ वय वर्ष 12 याचा आज दुपारी 1:00 वाजता बुडून दुखत मृत्यू झाला.

या स्विमिंग पूलातील तळाची फरशी पूर्णपणे फुललेली असून अनेक जण मार लागून जखमी झालेले आहेत.

त्यात या मुलाला सुद्धा मार लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर प्रशासन प्रत्येक बाबीत लापरवाह आहे.

स्विमींग पुलावर पोहण्याचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षीत नाहीत सतत मोबाईलवर वेळ घालवतात.

आज आपल्या मित्रा सोबत मो. बिलाल पोहत असताना पाण्यात बुडू लागला पण तेथील स्टेनर ला आवाज देवून ही ते मोबाईल मधून बाहेर आले नाहीत.

तसेच स्विमिंग पूल ठेकेदाराकडे कामाला असलेल्या व्यक्तीने त्याला सरकारी दवाखाण्यात टाकून निघून आल्याने शहरात तनावाचे वातावरण आहे.

शेख अजीम शेख गणी कुरेशी यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी व स्विमींग पूल कंत्राटदार एस. अनुप भावूका व गणेश भराडे यांच्यावर कामात लापरवाई केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

तनावाची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाचे चोक बंदोबस्त ठेवला आहे.

अशी माहिती डॉ. अंबेजोगाईकर (संपादक पा अग्निबाण उमरखेड) यांनी दिली आहे.