


✒️मनोहर गोरगल्ले(खेड,विशेष प्रतिनिधी)
राजगुरूनगर खेड शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ वएकनाथ शिंदे यांच्या बंडा विरोधात शिंदे यांचा पुतळा जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आला .
यावेळी शिवसेनेच्या वतीने शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक अँड. गणेश सांडभोर, महिला जिल्हा संघटिका विजया ताई शिंदे व मा. जिल्हा प्रमुख राम शेठ गावडे यांनी निषेधार्थ नोंदविला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, मा. तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, महेंद्र घोलप, पप्पू राक्षे, अविनाश मुळुक, संकेत खुंटवड, गोरक्ष सुकाळे, मंगल सोनवणे, अर्चना सांडभोर व आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर आंदोलन माजी जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, व शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक अँड. गणेश सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.




