आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26जून):-कर्ते समाजसुधारक, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू मराराजांना गंगाखेड येथे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. किसान सभा आणि हमाल युनियन, गंगाखेडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड राजन क्षीरसागर होते. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे डॉ. देवीदास चव्हाण, रिपब्लिक सेनेचे भैय्या भालेराव, जेष्ठ नेते गोपीनाथराव भोसले, रणधीरराजे भालेराव, नाभीक सेनेचे बालासाहेब पारवे, युवक कॉंग्रेसचे सिद्धार्थ भालेराव, माजी नगरसेवक आजीजभाई गुत्तेदार, नागेश डमरे, जगन्नाथ आंधळे आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती.

कॉ. क्षीरसागर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गोविंद यादव, रामप्रभू मुंडे यांची समायोचीत भाषणे झाली. आयोजक कॉम्रेड ओमकार पवार यांनी प्रास्तावीक, योगेश फड यांनी सुत्रसंचालन केले. पत्रकार रोहिदास लांडगे, गुणवंत कांबळे, बालासाहेब कदम, सरवर भाई, दत्ता यादव, माजी सरपंच श्रीकांत गायकवाड आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमास उपस्थित होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED