राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तक भेटीचा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी – ना.बाळासाहेब पाटील

78

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26जून):-आज राजश्री शाहू महाराज यांची 149 चा वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने राबवलेला राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा या पुस्तक भेटीचा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून असे उपक्रम इतर संस्थांनी राबवताना आदर्शमाता प्रतिष्ठानच्या कामातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या वरती गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शाहू महाराज वसा आणि वारसा या पुस्तक भेटीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, कराड तालुक्याचे युवा नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील-उंडाळकर दादा, ओबीसी संघटनेचे भानुदास वास्के, वनश्री पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्यासह निवडक मंडळींना राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त कराड येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, वनश्री प्राय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोसले, आदर्श माता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, पाडळी केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर,दिलीप महाजन,भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे, ओबीसी संघटनेचे भानुदास वास्के, राजर्शी शाहू महाराज जयंती समितीचे बाबासाहेब कदम कळके,संजय कांबळे, दत्तात्रेय दुपटे, विजय वायदंडे सहा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने राबवण्यात आलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या वरती गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शाहू महाराज वसा आणि वारसा या पुस्तक भेटीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, कराड तालुक्याचे युवा नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर दादा, ओबीसी संघटनेचे भानुदास वास्के, वनश्री पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्यासह निवडक मंडळींना राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान नी राबवलेल्या पुस्तक भेटीचे कौतुक कराडचे माजी नगरसेवक भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी कौतुक केले.