अंजनवती येथील वीज केंद्राचे काम आमदार संदीप क्षीरसागर यांच्यामुळेच मंजुर माजी मंञी जयदत क्षीरसागरानी फुकटचे क्ष्रेय लाटु नये–विवेक कुचेकर

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.26जून):- तालुक्यातील चौसाळा सर्कल मधील अंजनवती येथे वीज उपकेंद्र व्हावे व परिसरातील गावांचा विजेचा गंभीर प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार संदीप क्षीरसागर व लोकनेते डॉ बाबु जोगदंड यांनी स्थानिक व मंञालयीन स्तरावर पाठपुरावा करून वीज उपकेंद्राला मंजुरी मिळवून प्रश्न मार्गी लावला आहे.हे काम सध्या निविदा प्रक्रियेपंर्यत पोहचले असुन पूर्णत्वास आले आहे

काही दिवसातच याकामाला सुरूवात करण्यात येणार आहे पंरतु यातच माजी मंञी जयदत क्षीरसागर यांच्यामुळेच अंजनवती वीज उपकेंद्राला मंजुरी मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून या कामाचे फुकटचे क्ष्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी मंञी जयदत क्षीरसागर हे करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट नेते विवेक (बाबा )कुचेकर यांनी केला आहे.

जयदत क्षीरसागर हे पालकमंत्री असताना हे काम का झाले नाही ?तुम्ही सत्तेत असताना नाही, आणी सत्तेत नसताना मंञालयीन स्तरावरील कामे कशी मार्गी लावता असे विविध प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत असुन या कामाचा पाठपुराव्याचा एकही कागद जयदत क्षीरसागर यांच्याकडे असेल तर त्यांनी तो जाहीर करावा या भागातील नागरिकांनी जयदत क्षीरसागर पालकमंञी असताना वेळोवेळी मागणी करून देखील दुर्लक्ष केले व आता फुटचे क्ष्रेय लाटत असुन जनतेला वेड बनविण्याचे धंदे जयदत क्षीरसागरानी बंद करावेत आगामी काळात दुध का दुध और पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट नेते विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकाद्वारे दिला आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED