आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन की बात कार्यक्रम संपन्न

31

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.26जून):-येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात २६ जून रोजी सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

याप्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मन की बात द्वारे नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. नवीन अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात अनेक अश्या गोष्टी आहे जे आपल्या पर्यंत पोहचत नाही त्या गोष्टी प्रधानमंत्री मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहचवतात. चंद्रपूर जिल्ह्यात आजचा कार्यक्रम प्रत्येक बुथवर बुथ समितीच्या माध्यमातून घेण्यात आला.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, सचिन बोंडे, लता आवारी, नेहा कुम्मरवार, उमेश दडमल, शीतल कामतवार, भारती परते, स्वाती गंगाधरे उपस्थित होते.