नायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी

✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव बाजार(दि.२७जुन):-शहरातील डॉ हेडगेवार चौक येथे छ. राजश्री शाहू महाराज यांची जयंती गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली.छञपती .राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला नायगाव जनता विकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, मा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, गजानन पाटील चव्हाण,सह सामाजिक कार्यकर्ते राजकूमार कांबळे, गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मोठ्या भक्तिभावाने अभिवादन करण्यात आले.

राजश्री शाहू महाराज त्यांच्या कार्याला त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन करून वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना गजानन चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी हार्दिक शुभेच्छा! दिल्या.

यावेळी माधव रेजितवाड, शंकर धर्मकार, पञकार शिवाजी कुंटूरकर,जय भीम मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम वाघमारे, राजपूत सर, डॉ.चिकणेकर साहेब,राजपाल सोनटक्के, अनिल हनमंते, बाबासाहेब वाघमारे, अविनाश साबने, हानमंत वाघमारे, राहूल वाघमारे, सह गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाचे कार्यकर्ते, जनता विकास आघाडीचे आदी मान्यवर इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले ,

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED