लोकनेते दि बा पाटील नामकरण आंदोलन आणि एकनाथ शिंदेंची खेळी?

लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास द्यावे यासाठी ठाणे पालघर मुंबई नवी मुबई रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी फार मोठे आंदोलन केले.

आपल्या देशात संसदीय लोकशाहीत लोकसभा आणि राज्यसभा या केंद्रीय सभागृहांना जेवढे महत्व आहे तेव्हढेच ग्रामपंचायत आणि महानगर पालिकाना म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आहे.

देशातील केंद्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय सत्तास्थानावर ब्राह्मण क्षत्रिय( मराठा ) वैश्य या जमीनदार सरंजामी जातींचे वर्चस्व आहे.मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी जातीतील लोकांचा सत्तेतील प्रवेश थोपवून धरण्याचे काम देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे कॉग्रेस भाजप करीत आले.यांनी संगनमत करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी राजकीय आरक्षण संपविले आहे.

ओबीसी वरील या अन्याया विरोधात ओबीसी मधील कोणतीही जात अजूनही आक्रमकपणे मैदानात उतरली नाही.मागील काळात ओबीसी नेते दि बा पाटील यांच्या नावाच्या मागणीला विरोध महाविकास आघाडीने धरला.”हिंदू हृदय सम्राट” या आभासी नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नवी मुबई विमानतळ प्रकल्पास देण्याचा अट्टाहास मराठा नेते ,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला.

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे समतावादी विचार विसरून देशात मागास वर्गीयांच्या शोषणास कारण ठरलेल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या महायुतीत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अडकले.

ज्या आगरी कोळी भंडारी कराडी मच्छीमार बारा बलुतेदार शूद्र जातींनी कोकणात छत्रपती शिवरायाना स्वराज्यात मोलाची साथ दिली त्याच सागरपुत्रांनी शिवसेनेलाही उभे केले होते.

महायुतीत पितामह झालेल्या शरद पवारांना हे माहीत आहे.ते येथली सामाजिक राजकीय स्थिती जाणतात.अर्थात महाराष्ट्राचे माजी विरोधीपक्ष नेते दि बा पाटील आणि दत्ता पाटील यांना शरद पवार यांच्या इतके वर्तमान राजकारणी कुणीही ओळखत नसावे?

देशाच्या आर्थिक राजधानी मुबंई वर ताबा मिळविणे हे दिल्लीवर राज्य करण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे हे जाणून लोकनेते दि बा पाटील या स्वच्छ साध्या गरीब नेतृत्वासमोर बाळासाहेब ठाकरे या पंच तारांकित श्रीमंत.लोकशाही विरोधी सीकेपी नेतृत्वाचा पर्याय देऊन भूमिपुत्र ओबीसींना मुबंई बाहेर हद्दपार करण्याचा प्रयत्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यातील मराठा नेतृत्वाने केला.

शिवसेनेच्या हिंदुत्वात गुलाम झालेला आगरी कोळी ओबीसी बंड करणार नाही.ओबीसी राष्ट्रीय नेते माजी आमदार (चार वेळा)खासदार (दोन वेळा)असलेल्या, दि बा पाटील ज्यांच्या पुढल्या पिढीतील मुलगा नातू ,नात कुणीही राजकारणात नाही ,येण्याची सुतराम शक्यता नाही त्यांच्या समोर ज्या बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.नातू पर्यावरण मंत्री आहे त्याचे अख्खे महाराष्ट्र सरकार आहे ते कडवे आव्हान उभे केले.अत्यन्त विषम अशी ही लढाई कोकणात उभी राहिली.

लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाला पाठींबा देण्यासाठी त्यांचा स्वतःचा असलेला शेकाप पुढे आला नाही.अर्थात मराठा सीकेपी उच्चवर्णीय युतीचे मांडलिकत्व त्याने पत्करलेअसावे?.
शेकाप कार्यकर्ते मात्र दि बांच्या सोबतच आहेत.

दि बांचे मित्र माजी खासदार ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा दिला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्वे सर्वा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या आंदोलनात आघाडीवर पनवेलचे माजी महापौर जगदीशभाई गायकवाड यांना उभे करून आंदोलनात खरा रंग भरला आहे.अलीकडेच कॉग्रेस पक्षाने त्यांच्या ओबीसी चिंतन मेळाव्यात दि बांच्या नावाला पाठींबा देऊन देशातील ओबीसीना आम्ही पाठींबा देत आहोत असे सांगितले असले तरी कॉग्रेस पक्षातील मराठा लॉबी पुढे येऊन कधीच जाहीर पाठींबा देईल असे वाटत नाही.

दि बा पाटील नामकरण आंदोलन हे ओबीसींचे राष्ट्रीय आंदोलन आहे.केंद्रातील सत्तेत प्रमुख असलेल्या भाजपाने शक्य असताना अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही.त्यांनाही मराठा सीकेपी यांच्या प्रमाणेच मुबंईचीच सत्ता हवी.त्यासाठी शिवसेना त्यांना हवी आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी दि बा नचे नाव देऊन शिवसेने विरोधात भाजप जाणार नाही हे इथले भूमिपुत्र जाणतात.

आज दि बांच्या आंदोलनात माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर असले तरीही भाजप दि बा प्रमाणे या दोन बलाढ्य नेत्यांना हवा तसा सन्मान देत नाही.अर्थात दि बांच्या समर्थनार्थ उतरलेल्या या नेत्यांकडे नैसर्गिकपणे मुबई परिसरातले लोक मोठ्या विश्वासाने उतरले आहेत.हजारोंच्या संख्येने उतरलेल्या आंदोलकांनी शिवसेना महाविकास आघाडीलाच नाही तर भाजपलाही हे दाखवून दिलेय की मुबंई ही आगरी कोळी भंडारी बारा बलुतेदार ओबीसींचीच आहे.

दि बा पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन स्वामिनिष्ठा दाखवायला निघालेला सरंजामी मराठा मंत्री सगळ्यात मोठा गद्दार शिवसैनिक निघाला ज्याने पक्षच खाऊन टाकला.
पक्षनिष्ठा हा निकष लावला तर आगरी कोळी ओबीसींचे मतदार आणि कार्यकर्ते हाच ठाकरे कुटूंबियांचा शेवटचा आधार होता आणि राहणार आहे हे खारघर येथील शिवसैनिकांनी दाखवून दिले.

दि बांच्या आंदोलनातून समतेचे आंदोलन उभे राहत आहे.सरंजामी वृत्तीच्या नेतृत्वाने शिवसेनेत नवे जुलमी लुटारू सरंजामी नेतृत्वच उभे राहिले. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मुबंई तील मूळ जमीनमालक असलेल्या आगरी कोळी भंडारी याना देशोधडीला लावून रिक्षाचालक ते मंत्री होऊन ,चहा वाला पंत प्रधान हे राजकीत तत्वज्ञान साकार केले.

समृद्धीचा महामार्ग नागपुरी सत्ताकेंद्राशी शिवसेनेला जोडणारा ठरला.हजारो कोटींचा गुजरात ते गुहावटीचा असामी प्रवास साऱ्या देशाला दाखविला आहे.

सामान्य माणूस हा प्रामाणिक निसर्ग नियमाच्या आधारे जगत असतो. मुबंई जिकण्याच्या नादात ईडीच्या जाळ्यात शिवसेनेला अडकवून त्याला राजकीय बंडाचे तत्वज्ञान देऊन सत्ता मिळत नसते? हे भाजप आणि सेनेलाही कळले नाही.

सामान्य माणसाला ते कळते.आज हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे सारे शब्द हे आभासी आहेत हे सिद्ध झाले.एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनी बिल्डरांना घेऊन सायन कोळीवाड्यासह मुबंई ठाणे रायगड पालघर येथील शेतजमिनी बिल्डरच्या घशात घालणारे राजकीय नेते हे फक्त दलालच असतात.,लोकप्रतिनिधी नसतात.

उद्धवजी सायन कोळीवाडा हा कोळीवाडा आहे म्हणजे झोपडपट्टी नाही हे न कळण्याइतके तुम्ही बावळट नाही ना?
अहो सायनकर आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन तुमच्या दारात मदतीसाठीआले .

तुमचे मंत्री अनिल परब यांनी घरे वाचविण्यासाठी पत्र दिले.खासदार राहुल शेवाळे यांनीही तसेच पत्र दिले की सायन कोळीवाड्यातील माझी बहिण विना केणी यांचे घर तोडू नये.ते पत्र पेशवीन आनंदी बाईचेच पत्र ठरले.सायन कोळीवाडा तुटला हो!

अहो शेकडो पोलीस घेऊन रस्त्यावर आणलेत ना आम्हाला !कोणासाठी? सुधाकर शेट्टी या बिल्डर साठी?या जगात न्याय आहे.याच बिल्डर लॉबीने तुमचा रिक्षावाला खरेदी करून तुम्हाला वर्षां बंगळ्यातून बाहेर काढले.

तुमच्या सर्वात विश्वासू मराठा मंत्र्याने केलेली ही गद्दारी महाराष्ट्राच्या कोणत्याच मुख्यमंत्र्याच्या वाट्याला आली नाही.आमची दोनशे गावठाणे मुबंई त आहेत ठाणे पालघर रायगड येथल्या घरांना जो हात लावेल तो असाच ,स्वतः मुबंई सोडून जाईल. आज तुमच्या गद्दार आमदार मंत्र्यांना त्यांच्याच बायका स्वीकारतील की नाही ही शंका आहे.

मुबई हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक एकविरा आईचे स्वरूप आहे.उद्धवजी तुमच्या सेनेच्या बंडाचे आम्हाला वाईट वाटत नाही अहो ज्यांचे मीठ खाल्ले मासे खाल्ले त्या कोळीवाड्यांस तोडणारी तुमची विश्वास घातकी कृती तुम्हांस मातोश्रीच्या कुशीत झोपू देणार नाही.

मुबई ची मातृसत्ताक कोळी महिला तुम्ही मार्केट मधून बाहेर काढणारे महापातक तुम्ही केलेत.इथल्या चालत्या बोलत्या आईशी कोळीण मावशिशी तुम्ही गद्दार झाले.तुमचा कुठला देश ?आणि कोणता धर्म? सागा ना?

इथल्या भूमीत इथल्या सागरात मानाचे स्थान आम्हा सगरपुत्रांना देणारे छत्रपती शिवराय कुठे?महात्मा फुले सावित्री माई कुठे?जमीन मालकी आरक्षण संविधान देणारे,डॉ बाबासाहेब आबेडकर कुठे ?नारायण नागु पाटील कुठे?लोकनेते दि बा पाटील कुठे दत्ता पाटील कुठे?

इथल्या मातृभूमिसाठी स्वतःचे रक्त सांडणारे हे महापुरुष आम्हाला “इस्टेट” नाही तर विचार देऊन गेले.म्हणून आम्ही लढतोय.आपल्या सर्व आमदार मंत्र्यांनी मातोश्री मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बदनाम केले आहे.चोरी करायची ती लपविण्यासाठी ईडीला घाबरून छत्रपती शिवरायानी खोदून काढलेल्या लुटारू सुरतेच्या मार्गाने आमच्या मुबंई ला मनुवादी गुज्जू सत्ताधाऱ्यांनच्या हाती सोपवायचे.

आम्ही आगरी कोळी भंडारी ओबीसींना राजकारण कुणीही शिकवू नये.
हिंदुत्वाच्या नावाने मोदींनी ही आम्हास मूर्ख समजू नये.आपण नवी मुबई विमानतळ आपले जातभाई अदानी ला विकला असला तरी तेथे विमान उडवायचा निर्णय दि बा पाटलांचे वैचारिक वारसदार घेणार.

मोदीजी स्वतःच्या आईची भीती ठेवा निदान तिला फसवू नका.भारत माता हीच भारतीय स्त्री आहे.मातीशी गद्दारी नको.विमानतळाला दि बांचेच नाव हवे.

चारित्र्य हीन आमदार मंत्री,पंत प्रधान राजकीय पक्ष याना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक चारित्र्य सांगणारे तत्वज्ञान आणि भारतीय स्त्री शुद्रतिशूद्र स्वीकारत नाहीत.

मागील दोन हजार वर्षे सत्ता आल्या आणि गेल्या.पोलिसी सैनिकी ताकद मुबई ठाणे रायगड पालघर येथील उत्तर कोकणावर कधीच चालली नाही.या अपरांत प्रदेशात मातृसत्ताक एकविरा समतेची संस्कृती नादली!

दाढी धारि सरंजामी पुरुषसत्ताक क्षत्रिय एकनाथ शिंदे आगरी कोळी ओबीसीच्या विश्वासास पात्र राहिला नाही.तो आज खऱ्या अर्थाने अनाथ झाला.

लोकनेते दि बा पाटील यांचे सिडको विरुद्धचे 1984 चे आंदोलन पाच हुतात्मे देऊन मातृभूमीशी आमचे रक्ताचे नाते सांगते.असे तत्वज्ञान तुमच्या नव्या सैनिकांना ध्या.ते गद्दारी करणार नाहीत.आता विमानतळाला नावच काय आम्ही मालकीची नोटीस लावतोय.उद्याच सारे विमानतळ सिडको प्रकल्पग्रस्त न्यायालयात चाललोय आम्ही.

उद्धवजी तुमच्या घरात दि बांचा फोटो लावा च.देशाच्या सीमेवरच्या सैनिकानाही आदर्श वाटावा असे आम्ही दि बांचे सैनिक आहोत. तुम्ही देशाच्या सीमेवर लढता आम्ही इथल्या रायगडच्या भूमीसाठी छातीवर गोळ्या झेलल्या. शत्रू सीमेवर आहे तसा देशातही आहे.जागते रहो.

✒️राजाराम पाटील(उरण रायगड)मो:-8286031463

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED