झाडीबोली साहित्य मंडळातर्फे दरवर्षी १ जुलै हा दिवस झाडी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करणार ..

31

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चीमूर(दि-1जुलै)झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष संशोधनमहर्षी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीपट्टी शब्दसाधक ग्रंथ२०१३ मध्ये प्रकाशित केला. याप्रकाशनाप्रसंगी त्यांनी झाडी शब्दसाधक दिवस साजरा व्हावा , अशी इच्छा व्यक्त केली होती . त्यानुसार त्यांच्याच अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने यापुढे दरवर्षी १ जुलै ह्या दिवशी झाडी शब्दसाधक दिवस साजरा करण्याबाबत झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीने मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे ह्या दिवशी झाडीपट्टीतील ज.गो.संत , जगदिश कुंभरे , हिरामण लांजे , बापुराव टोंगे ,पत्रूजी खोब्रागडे , गंगाधर कुनघाडकर , रमेशकुमार गजबे, रामभाऊ कपले, जगदीश कुंभरे, वामनराव गजभीये ,भास्कर मेश्राम , जागेश्वर कोरेकार , गोकुलदास मेश्राम , सुधाकर मार्गोनवार , शंकर जवादे, प्रियंकला मेश्राम , दौलतभाई पठाण , अंताराम गिर्हेपुंजे , चुडाराम बल्लारपुरे ,क.ब.पेंदे , काशीनाथ नागोशे , चंद्रमणी भडके , युवराज गंगाराम, वसंत चन्ने इत्यादी २३ झाडीसाहित्यिक जन्मास आलेले आहेत. जगात अन्य दिवस साजरे होत असले तरी साहित्यिकाचा दिवसमात्र साजरा केला जात नाही . तथापी झाडीबोली साहित्य मंडळ यापुढे दरवर्षी हा झाडीशब्द साधक दिवस साजरा करणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम न घेता यावर्षी आॕनलाईन पध्दतीने शाखास्तरावर हा दिवस साहित्यलेखन वाचन कृतीने साजरा करणार असल्याचे मत केंद्रीय समितीच्या वतीने माजी झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले आहे.
यानिमित्ताने डाॕ. हरिश्चंद्र बोरकर विशेष मनोगत आॕनलाईन पध्दतीने व्यक्त करणार आहेत.


🔹झाडीबोली साहित्य बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्या करिता मा.बंडोपंत बोढेकर(9975321682) यांच्या सोबत संपर्क साधावा