आज पासून बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा 3 दिवसीय भव्य प्राणप्रतिष्ठासोहळा आयोजित

25

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.29जून):- धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे भव्य मंदिराचे निर्माण कार्य नुकतेच पूर्ण झाले. असून मूर्ती स्थापन भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

3 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला असून 29/06/2022, 30′ व 1 यातारीख असा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची रूप रेखा 29 तारखेला बुधवारी दुपारी 1 वाजता प्रायश्चित्त पूजन ,कलश पूजन , कुमारिका पूजन आहे.नंतर 30 तारखेला गुरुवार रोजी सकाळी 7 वाजे पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे पूजन आहे. त्यात प्रधान संकल्प गणपती पूजन मूर्तीण्यात 9 ग्रह पूजन हवन विविध पूजा आहेत.नंतर रात्री 9 ला भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.1 जुलै रोजी सकाळी 7 ते 1 मध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होईल.तसेच प्रसाद व महाप्रसाद असून येणारे सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गजानन परिवार तर्फे करण्यात आले आहे.

श्री गजानन महारांची मूर्ती अप्रतिम,अत्यंत देखणी सुरेख अशी आहे. मूर्ती राजस्थान जयपूर येथून बनविण्यात आली आहे. ही मूर्ती शेगाव येथे असलेल्या मूर्ती प्रमाणेच ही मूर्ती आहे. मूर्ती ही जयपूर येथील सुप्रसिद्ध मुर्तीकाराने बनविली आहे. बाभूळगाव येथे असलेलं श्री गजानन महाराजांचे मंदिर अवघ्या 1 वर्षात पूर्ण झाले असून मंदिर पूर्ण मारबल मध्ये असून अत्यंत देखणे व सुरेख आहे. मंदिराच्या निर्माण कार्यास श्री प्रमिला दयाराम महाजन यांनी अनमोल अशी मदत व मार्गदर्शन केले आहे.बाभूळगाव परिसरातील तसेच पूर्ण जिल्यातील सर्व भक्तांनी 1 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थती द्यावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. सौ. प्रमिला दयाराम महाजन ( बडोदा) श्री गजानन परिवार व बाभूळगाव ग्रामस्थांनी केले आहे.