देशाला सामाजिक परिवर्तन व न्याय देण्यासाठी राजश्री शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे – एस. पी. गाडगे

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.29जून):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती , बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघ कारंजा घा. जि. वर्धा यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घा. जि. वर्धा येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्म मित्र एस.पी.गाडगे ,सोमनाथ विद्या मंदिर उमरी चे माजी मुख्याध्यापक गोपाळराव घाडगे ,कारंजा नागरि संघर्ष समितीचे विनोद चापले, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्म मित्र सदाशिवराव मनोहरे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेश दहीवडे हे विचार मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाची किंवा राज्याची बागडोर सांभाळणारे राज्यकर्ते राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचे असले पाहिजे कारण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मध्ये उच्चवर्गीयां पासून ते मागासवर्गीया पर्यंत जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक ,शैक्षणिक व संस्थांमधील प्रशासकीय अधिकार यांचा समान वाटा देऊन जनतेला उपकृत केले.

असा नैतिक मूल्य जोपासणारा एकमेव राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज .याच नैतिक मूल्याचा आधार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान तयार केले. अशा या सामाजिक न्याय जोपासणाऱ्या, कुणावर अन्याय न होता राज्यकारभार चालवणाऱ्या राजा चे विचार प्रत्येक बहुजनांनी अंगीकारले पाहिजे व त्याच्या विचारांची जागृती करणे हीच खरी आदरांजली .

अशाप्रकारे एस.पी .गाडगे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले तसेच विचार मंचावरील उपस्थितांनी जयंती प्रसंगी आपले आदरांजली पर मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश दहीवडे ,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचे कार्यवाह अशोक नागले यांनी सूत्रसंचालन केले तर आयटीआयचे दशरथ डांगोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ताराचंद चापले ,संघर्ष समितीचे रवी गाडरे ,धम्म मित्र जी.आर .गवई , धम्ममित्र जी. टी. बोरकर, वामनराव घारपुरे, सोनू येसनकर, अनिता कांबळे, धम्म मित्र मंदा नागले, रामदास तायडे व आदींनी सहकार्य केले .

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED