वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जून):-हरित क्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र ,माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रत्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल ,श्रीफळ ,स्मृतीमानचिन्ह, व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसदच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे सुदीर्घ अशी परंपरा आहे.

१)विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांची आपल्या शेती विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला. याची सविस्तर माहिती द्यावी.

२) यावर्षी शास्त्रज्ञां करिता – *तेलबिया*( सोयाबीन, भुईमूग, तीळ सूर्यफूल ,मोहरी) *उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष संशोधनात्मक कार्यासाठी* हा विषय निवडला आहे .ज्यांनी तेलबिया पिकामध्ये उत्पादन करून नवीन जातीच्या बियाणाची निर्मिती केली असेल आणि त्यावर प्रात्यक्षिक करून अधिक उत्पादन घेतले असेल अशा शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख(बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.

३)शास्त्रज्ञांकरिता दुसरा विषय- हळद प्रक्रिया उद्योग यावर विशेष संशोधनात्मक कार्यासाठी हा विषय निवडला आहे. संबंधित शास्त्रज्ञाने त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.

४) खालील विषयावर कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष पुरस्कार अ) कृषी क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणारी शेतकरी उत्पादक कंपनी
ब) जोड व्यवसायातून कृषी पर्यटन वरील विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी देखील सविस्तर माहिती सह प्रस्ताव पाठवावा.

वरील सर्वांनी आपले प्रस्ताव २ पासपोर्ट फोटोसह दि.१० जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पत्रव्यवहाराचा पत्ता :- कृषिभूषण दीपक आसेगावकर अध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर, पुसद ४४५२०४ जि.यवतमाळ, भ्रमणध्वनी दीपक आसेगावकर-९९२२५५२२२२, प्रा.अप्पाराव चिरडे -९४०४२३६२३६, उत्तमराव जाधव -७५८८०४३०३६ ईमेल vppusad@gmail.com