होमगार्ड्स पथक नागभीड येथील सैनिक आर्मि मध्ये भरती झालेल्या सैनिकांचे सत्कार सोहळा संपन्न

62

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.1जुलै):- होमगार्ड पथक नागभिड च्या वतिने होमगार्ड सैनिकांचे सत्कार सोहळा कार्यक्रमाचे जिल्हा परिषद प्राथमिक बेशिक नागभिड येथे दिनांक 26/06/2022 रोज रविवारला संपन्न झाला, सत्कार मुर्ती माजी होमगार्ड सैनिक हे 2016मध्ये संघटनेत भरती झालेले श्री,मंगेश भसाशंकर स,नं 1400 हे आमीॅ मध्ये सन 2021 भरती झाल्याबद्दल त्यांना शाल श्रीफल भेट वस्तू, पुष्प ,गुच्छ ,हार घालुन मान –सम्मान करुण सत्कार सोहळा साजरा करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थांनी प्रमुख मान्यवर म्हणून श्री,राजूजी मेंढे साहेब पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन नागभिड, श्री, गुलजार जी धम्मानी अध्यक्ष व्यापारी संघटना नागभिड,श्री,हनिफभाई जादा साहेब माजी अध्यक्ष व्यापारी संघटना नागभिड श्री, सुधीर राव गिरडे ,माजी प्रभारी अधिकारी होमगार्ड पथक नागभिड, श्री, श्यामजी पाथोडे साहेब अध्यक्ष पञकार संघ नागभिड,श्री, मुजाहिदीन खाॅ पठान होमगार्ड समादेशक अधिकारी ब्रम्हपुरी श्री, भालचंद्र खंडाळे मुख्याध्यापक जि,प, शाळा पारडी इत्यादि च्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमाचे संचालन होमगार्ड सैनिक यशवंत निकुरे, तर प्रास्ताविक मा, अंशकालिक लिपिक अरुण भोले आभार प्रदर्शन होमगार्ड समादेश अधिकारी श्री प्रमोद जक्कनवार यांनी मानले, कार्यक्रमास होमगार्ड पथक नागभिड येथील बहुसंख्येनी पुरुष व महिला सैनीक उपस्थित होते.