संविधानिक पदावर राहून हिंदुत्व-हिंदुत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद व्हावा

30

🔸डेमोक्रॅटिक रिपाईच्या पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे मत

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.2जुलै):-संविधानिक पदावर राहून संविधानाच्या विरोधात हिंदुत्व-हिंदुत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा नोंद व्हावा असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या लढवय्या संघटनेचे संस्थापक महासचिव पॅन्थर माकणीकर म्हणाले की, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून लोकशाही मार्गाने निवडून येऊन ज्या संविधानाची शपथ घेऊन पदभार सांभाळता, संविधानिक पदावर स्थानापन्न होता आणी हिदुत्व-हिन्दुत्व करता हा भारतीय संविधांना चा घोर अपमान असून हा राष्ट्रद्रोह ठरवावा. व अश्या बेईमान लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा नोंदवून जेरबंद करन्यात् यावे असे ही ते म्हणाले.

संविधानिक पदावर राहून कोणत्याही एका धर्माचे गुंन गान करून भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोक प्रतिनिधी ला क्षमा न करता संबंधित परिसरातील दक्ष नागरिक किंवा पोलीस अधिकाऱ्याने तात्काल दखलं घेऊन होणाऱ्या किंवा घडणाऱ्या असंवेधानिक कृत्याला आळा घालावा. असेही आवाहन डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले.