ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरेंना विधान परिषदेवर घ्या

26

🔹 राज्य मराठी पत्रकार संघ गोंदियाची मागणी

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि:-1जुलै)ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची मागणी महाराष्ट्र् राज्य मराठी पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने आज(30) राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसीलदार विनोद मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात,संजय भोकरे हे महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ञ,क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत छत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते,थोर समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. जेष्ठ संपादक असलेले संजय भोकरे हे श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगली सारख्या ग्रामीण भागात अभियंत्रीकीच्या शिक्षणाची दारे खुली केली.शिवाय याच संस्थेमार्फत अनेक पहेलवान घडविले.त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी राज्यभर जाळे निर्माण केले.
पत्रकार संघात आघाडीचे चैनल ,दैनिकाचे संपादक,वृत्तसंपादक,पत्रकार,बातमीदार, वार्ताहर जोडले गेले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा अमलात यावा यासाठी त्यांनी स्वतंत्र लढा दिला व कायदा संमत करून घेतला.
तसेच राज्य पत्रकार संघाबरोबर पूर्ण देशभरात पत्रकारांचे व्यासपीठ असावे म्हणून ऑल इंडिया जर्नलिस्टची स्थापना केली. नवी दिल्लीत या संघटनेचे मोठे कार्यालय सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या काळात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राज्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांनी गरजूंना किराणा, धान्य ,जीवनाशक वस्तूचे वाटप करून देशसेवेचा वाटा उचलला.भोकरे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असून पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या सारख्या व्यक्तीची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यास राज्याला लाभ होईल.
संजयजी भोकरे यांची विधान परिषद सदस्य पदावर नियुक्ती करून आम्हा पत्रकारांस न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गोंदिया च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संतोष बुकावन,सुरेंद्रकुमार ठवरे,संजयकुमार बंगळे,श्रीधर हटवार,राधेश्याम भेंडारकर,अश्विन गौतम उपस्थित होते.