ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी……

56

ओबीसीच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी आज संघटीत होणे गरजेचे आहे. विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार, साहित्यिक, विचारवंतानी ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना,सत्तेतील राजकीय हिस्सेदारीसाठी समाजात जाऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे. ओबीसी कडे संपत्ती असेल आणि ज्ञान नसेल तर संपती काय कामाची?. भारतीय संविधान पाहिले नसेल तर वाचणार कधी?. म्हणूनच ओबीसी समाजात संविधान विषयी जनजागृती करणे अतिशय आवश्यकता आहे. विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असतांना सुतार समाजात ओबीसी बद्दल समाज जागृती होतांना दिसत नाही. आज समाजात ज्या गोष्टींची गरज आहे त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि वधू वर सूचक मेळाव्यावर जास्त भर दिला जातो.सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, कला,क्रिडा कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ओबीसी समाजातील तरुणाच्या कलाकौशल गुणवंता बाहेर काढण्यास संधी मिळेल.त्यामुळेच ओळख नसलेला ओबीसी तरुण समाजात ओळख निर्माण करेल.त्यातून वधू वर संशोधनाची मोठी समस्या सुटू शकते.ओबीसी समाजात इतर छोटेमोठे कार्यक्रम समाजात आयोजित केले जातात.त्यांचा राजकीय पक्षांना फायदा होतो.त्यातून कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो.तो ओबीसी समाजाचा नेता होऊ शकत आणि पक्षाचा पण नेता होऊ दिला जात नाही.प्रत्येक पक्षातील ओबीसी नेत्यांच यादी काढा त्यांच्या जातीत त्यांना किती मानले जाते ते तपासून पहा.ज्याला स्वताच्या जातीत किंमत नाही त्याला ओबीसी नेता म्हणून मोठे केले जाते.

म्हणूनच ओबीसी समाजाने हे समजून घेऊन बदलणे गरजेचे आहे.आता आज ओबीसीच्या कार्यकर्ता,नेता,पत्रकार,साहित्यिक, विचारवंतानी स्वताला बदलून घेतले नाही तर ओबीसीच्या भावी पिढीचे मोठे नुकसान झाल्या शिवाय राहणार नाही.राज्यात आणि देशात ओबीसी समाजातील विविध ओबीसी संघटना ओबीसी नेते, ओबीसी समाजात जनजागृती अभियान राबवित आहेत. असे असताना ही विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाच्या संघटना,संस्था आणि जबाबदार पदाधिकारी,नेतेमंडळी वैचारिक दुष्ट्या दिशाहीन अवस्थेत वावरत आहेत.त्यांच्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध पातळीवर कार्यरत पदाधिकारी मात्र ओबीसी बद्दल कोणताही ठोस कृती कार्यक्रम नसल्यामुळे गप्प बसून आहेत.त्यांच्या या वागण्यामुळे ओबीसीच्या येणाऱ्या भावी तरुण पिढीचे नुकसान होईल.ओबीसी समाजाची ५२ टक्के संख्या असतांना त्यांना कोणत्याही पक्षात मान्यताप्राप्त पद व निर्णय प्रक्रियेत स्थान नाही.आज नाही तर भविष्यात काय स्थान असेल.

ओबीसी समाजातील आजच्या पिढीला संविधान माहिती नसेल तर भावी पिढीला ते कोण सांगणार आहे.ओबीसी आरक्षण,जनगणना,राजकीय आरक्षण याबाबत कोणाचीच ठोस भूमिका नाही. सत्ते सहभाग नाही,त्याबाबतचे ज्ञान नाही. त्यासाठी समाजात संघटना, संस्था पाहिजेत.संबंधित असलेले सर्वंच पदाधिकारी आणि स्वतःला समाज नेते म्हनवुन घेणाऱ्या अशा सर्वच समाज मान्यवरांनी समाजात ओबीसी बद्दल आणि इतर विषयावर प्रबोधन,जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचा आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.सुतार समाज हा स्वताला सुशिक्षित उच्चवर्णीय समजतो.इथंच समाजात जागृतीचा मोठा अभाव जाणवतो, वास्तविक विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी समाज आहे. याचे भान सुद्धा नसावे याचे वाईट वाटते,सुतार समाजात आजही विश्वब्राह्मण म्हणजे उच्चवर्णीय समजतात आपण ओबीसी आहोत आणि ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक आहोत या बद्दल समाजात जबाबदारीने सांगण्यास कोणीही पुढाकार घेतांना दिसतं नाही त्यामुळे समाजात चुकीची माहिती पसरवली जाते आणि विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी समाजाचा एक मोठा ओबीसी घटक आहे.हे आजच्या तरुण पिढी पासून लपविले तर भविष्यात येणारी तरुण पिढी स्वताला काय म्हणून घेणार याचा गांभीर्याने विचार कोणी करतांना दिसत नाही.विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार,साहित्यिक,विचारवंतानी हे अज्ञान दूर केले पाहिजे.

अन्यता काळ त्यांना कधीच माफ करणार नाही.वास्तविक पाहता समाजात अनेक जबाबदार मान्यताप्राप्त व्यक्ती आहेत त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी समाज जनजागृती वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु असे होतांना दिसत नाही याला समाजाचे भाग्य म्हणावे कि दुर्भाग्य म्हणावे असा प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडला पाहिजे.पण जिथे बापच जाग्यावर नाही तर पोर काय करतील?विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात अनेक संघटना आहेत अनेक सामाजिक संस्था अस्तित्वात आहेत आणि त्या त्या सामाजिक संघटना संस्थेच्या कार्यकारिणी मध्ये सुशिक्षित उच्चशिक्षित,प्रतिष्ठित पदाधिकारी विराजमान आहेत.पण त्यांना स्वताची कोणतीही विचारधारा नसेल तर ते वर्ण व्यवस्थे नुसार श्रद्धा,सबुरीने गुलामगिरीचं स्वीकारतील.पूर्व जन्माचे पाप आहे हे कुणालाच चुकले नाही हे त्यांच्या मेंदूत कायम बसले राहणार.विश्वकर्मीय समाज आजही कर्मकांड,धार्मिकता,काल्पनिक गोष्टींचा प्रचार व प्रसार करतांना दिसतो समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकार केल्या शिवाय समाजात प्रगती होणार नाही याकडे समाजातील जबाबदार असणारे पदाधिकारी परखडपणे भाष्य करीत नाहीत.

समाजात परखडपणे जनजागृती प्रबोधन करण्यास धजावत नसतील तर त्यांना विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार,साहित्यिक,विचारवंत म्हणताच येणार नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे सामाजिक संघटना,संस्थेच्या कार्यकारिणीने समाजाला सत्य सांगितले तर समाज आपल्या पासुन दुर जाण्याची भिती सतावत असेल म्हणुन समाजात या बाबतीत जनजागृती प्रबोधन होत नाही. पर्यायाने समाजात अंधश्रद्धा आणि धार्मिकता बळावत जात आहे.आणि वैज्ञानिक दृष्टीकोन मागे पडत आहे हे कोणाच्याही लक्षात कसे येत नाही. हाच मोठा प्रश्न मला पडतो.विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार,साहित्यिक, विचारवंतांना का पडत नाही.समाजात सुशिक्षित वर्गाचे प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा समाजात अंधश्रद्धा आणि धार्मिकता दुर करण्यास अपयश का येते हा चिंतनाचा विषय आहे.असे मला वाटते विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार,साहित्यिक, विचारवंतांना काय वाटते माहिती नाही.मी वाचायला,बोलायला व लिहायला लागलो म्हणूनच समजायला लागलो.एकीकडे ओबीसी म्हणुन संवैधानिक दृष्टीने सर्वंच हक्क अधिकार मिळवायचे आणि दुसरीकडे ओबीसी बद्दल समाज प्रबोधनात्मक दृष्टीने मागे राहायचे असे दुटप्पी धोरणाचा अवलंब करायचा यामुळे समाजात वैचारिक आणि सामाजिक परिवर्तन होणार नाही.हे मला कळायला लागले.

ओबीसी बहुजन समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक दृष्टीने अधिकार हक्काची जाणिव करून दिलेली असतांना त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे यासाठी लढा उभारला पाहिजे विश्वकर्मीय सुतार समाजातील पत्रकार,साहित्यिक,विचारवंतांना का वाटत नाही.आजची तरूण पिढी उद्याचे भविष्य आहे.असे केवळ बोलून चालणार नाही.तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन आणि पर्याय दिला पाहिजे.तो मिळाला नाही तर तरूण पिढीचे भविष्यात वैचारिक नुकसान होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक आहे याचा विसर पडु नये.म्हणूनच भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी गरजेचे आहे.गांभीर्याने विचार करा,एकत्र बसून चर्चा करा,संवाद साधा विचारांची देवाण घेवाण करा शंभर टक्के मार्ग निघतो.यावर माझा विश्वास आहे म्हणूनचं मी ही अपेक्षा करतो.

✒️प्रमोद सुर्यवंशी(चिखली मातृतीर्थ बुलडाणा)मो:-8605569521