बकरी ईद साठी चंद्रकोर बोकडाला विविध राज्यातून मागणी!

🔹साप्तीच्या देवराव खंदारे यांचा छोटा चांद वाला बोकड

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466

नांदेड(दि.2जुलै):- जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती येथे
बकरी ईद थोड्याच दिवसावर आलेली आहे.

साप्ती येथील बोकडाला ईदच्या निमित्ताने मागणी वाढत आहे.
सविस्तर वृत्त असे की,नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील साप्ती येथे देवराव खंदारे यांचा हा छोटा चांद वाला बोकड सध्या तेजीत आहे.

जास्तीत जास्त दर या बोकडाला मिळेल या आशेने या श्रमकरी कुटुंबाने या बोकडाची लहान पना पासून आत्तापर्यंत अर्थात दोन वर्षे खूप चांगल्या प्रकारे त्याची देखभाल केली यांचे बोकड आता दोन वर्षाचे झाले डोक्यावर वरच्या बाजूला छोटी चंद्रकोर आणि तारा असल्यानं यालाही चांद तारा बोकडा सारखी किंमत यावी म्हणून हे कुटुंब आशेने बघत आहे.

अनेक जण माहिती मिळाल्याने त्यांच्या घरी बोकड बागण्यासाठी येत आहेत हा बोकड बकरी ईद जवळ आल्याने या बोकडांची मागणी वाढली आहे तसेच हे बोकड मुस्लिम समाजासाठी पूज्य असल्याने याही बोकडाच्या डोक्यावर छोटी का होईना चंद्रकोर आहे अर्थात वरच्या बाजूला चांद तारा आहे.

डोक्यावर चांद तारा असल्याने या बोकडाची किंमत लाखात यावी अशी खंदारे कुटुंबियांना आशा निर्माण झाली आहे.

खंदारे कुटुंबीय नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती या गावचे रहिवासी आहेत याचं गावात ते रोज मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात परंतु आपल्या कामाला जोड धंदा असावा म्हणून त्यांनी घरगुती बकरी पालन व कुक्कुटपालन करतात या व्यवसायात ते वाढ करण्याचा प्रयत्न करतात अशातच त्यांनी स्वतःच्या घरी असलेल्या बकऱ्या पैकी, हा बोकड त्यांनी लहानपणीच डोक्यावर चंद्रकोर (अर्धा चंद्र आणि चांदणी) असल्याने त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची विशेष काळजी घेतली व त्याचं पालनपोषण केले.

या बोकडांच्या विक्रीतून जास्तीत पैसे मिळतील असे छोटा चांद तारा असलेला बोकडाचा मालक देवराव खंदारे यांनी अशी आशा व्यक्त केली आहे.

डोक्यावर छोटी का होईना चंद्रकोर असल्याने खंदारे कुटुंबीयांना या बोकडांच्या विक्रीतून लाखो रुपये मिळतील अशा आशा त्यांची निर्माण झाली आहे आहे.

नांदेड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED