गजानन पा. चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान

30

✒️नायगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नायगाव(दि.2जुलै):-जीवन आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे डॉक्टर होय, डॉक्टरांचे कार्य पवित्र असून ते महान आहे त्यांची जाणीव ठेवून सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील सर्व डॉक्टर्स यांचा सन्मान माजी नगरसेवक देविदास पाटील बोंमनाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून नायगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या टीमचा सन्मान करण्यासाठी समाज हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. या सन्मान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक देविदास पा.बोमनाळे, तर ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण, पांडुरंग पाटील कल्याण, गोविंदराव पा.मोरे देगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे, डॉक्टर गजानन शिंदे, डॉक्टर काळे मॅडम, डॉक्टर सातव, नवघरे सिस्टर, माडेवार सिस्टर, सुधा सिस्टर, शिवाजी भुताळे ब्रदर, सेविका मीराताई, सेवक मठवाले, वडजे, सुरक्षा गार्ड सिद्धार्थ, पायलट कैलास शिंदे, मतीन पठाण यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रस्तावना गजानन पाटील चव्हाण यांनी मांडली तर डॉक्टर पोहरे यांनी गजानन पाटील चव्हाण व मित्र मंडळाचे आभार मानले.

यावेळी सदर मित्र मंडळाचे नायगांव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष — शिवानंद पांचाळ नायगांवकर, गणेश देगावे, अतुल मंगरुळे, अशोक पवार, कैलास वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, साहेबराव पवार, पत्रकार माधवजी बैलकवाड, पञकार हनुमंत चंदनकर , जयभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम वाघमारे, राजपाल सोनटक्के, यासह अधिजनाची उपस्थिती होती.
चौकट…………………………………..
महाराष्ट्रात यांचे सरकार आले, त्यांचे सरकार गेले, अशी चर्चा सर्वत्र होत असताना ज्या महान डॉक्टरांनी मृत्युच्या दाढेतून अनेक रुग्णांना बाहेर काढून जीवदान दिले अशा महान डॉक्टरांचा सन्मान करण्यास गजानन पा.चव्हाण यांच्या मित्र मंडळाच्या वतीने विसर पडलेला नाही हे विशेष.