बनावट कागदपञाच्या आधारे मिळविलेले ना-हरकत प्रमाणपञ रद्द करावे-शिवसेनेची मागणी

32

🔸नागभीड ब्रम्हपुरी रोडवरील देशी दारु दुकान प्रकरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.2जुलै):-नागभीड ब्रम्हपुरी महामार्गालगत वैभव हिरामन पिसे यांचे घरी नविन देशी दारु दुकान चालु करण्यात येत आहे.या देशी दारु दुकानासाठी नगरपालीकेकडे ना हरकत प्रमाणपञ मिळविण्यासाठी जे कागदपञ दाखल करण्यात आले आहे. ते कागदपञ बनावट असल्याने तपासणी साठी पाठवुन कागदपञाची सत्यता पडताळुन पाहावी. कारण जोडलेली कागदपत्रे संशयास्पद आहेत असा आरोप पञकार परिषदेत शिवसेने कडुन करण्यात आला आहे. या आधीही नगरपरिषदेला येथील पंचायत समिती व सुलेझरी नगरातील जनतेनी ना हरकत प्रमाणपञ देण्यात येवु नये या बाबतचे निवेदन देण्यात आले होते.परंतु नगरपालीकेने कोणतीही दखल घेतली नाही. माञ नगरपालीकेने बनावट कागदपञाच्या आधारे देशी दारु दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले.

एवढेच नव्हे तर सदर आक्षेपाच्या प्रती पोलीस अधिक्षक चंद्रपुर तसेच अधिक्षक , राज्य ऊत्पादन शुल्क चंद्रपुर यांना सुद्धा देण्यात आले. तसेच इमारतीचे वाणिज्य प्रक्रिया पुर्ण केली गेलेली नाही ,आणी बांधकामासाठी कुठलीही परवानगी घेतल्या गेलेली नाही, हे सर्व प्रकरण बनावट कागदपञाच्या आधारे करण्यात आले आहे. या प्रकरणात मोठ्या राजकीय नेत्याचा हात असावा असेही पञकार परिषदेत आरोप करण्यात आला. सदर प्रकरण हे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे. परंतु सदर प्रकरणात हेतु परस्पर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

तरी संबधित अधिकाऱ्यांनी देशी दारु दुकान चालु करण्यासाठी दिलेल्या ना हरकत प्रमाणपञावर विचार करुन रद्द करावा व दारुचे दुकान त्या ठिकांनी न लावता दुसरी कडे स्थानांतरित करावे, दारु दुकान लावण्यास मनाई नाही,त्या ठिकांनी दुकान पाहिजे नाही दिल्यास येथील जनतेचा आक्रोश भुमीका घेण्यास येईल या बाबत येथील पंचायत समिति व सुलेझरी जनतेनी दिनांक 30/6/2022 रोजी नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नागभिड निवेदन दिले आहे,अशी माहिती पञकार परिषद घेवून देण्यात आली, या वेळी उपस्थीत शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार, नंदु खापर्डे उपशहर प्रमुख , परवेश साबरी बाळु चिल्लमवार महिला आघाडी कार्यकत्या व बहुसंख्येने शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.