महाराष्ट्र सेने तर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

    37

    ✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    औरंगाबाद(दि-1जुलै)  महाराष्ट्र सेने तर्फे हरितक्रांती चे प्रेणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सिडको येथील पुर्णाकृत पुतळ्या ला महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख राजु भाई साबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    या वेळी राजु भाई साबळे यांनी वसंतराव नाईक साहेबांच्या आठवणीना उजाळा देत नाईक साहेबाची शेतकऱ्यां विषयी असलेला जिव्हाळा मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या कारकिर्दित असताना त्यांनी लोकहिताचे जे कार्य केले असे अनेक आठवणीना उजाळा देत ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित राठोड हे होते या वेळी जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे,नंदकुमार अंबुरे,राजकुमार अमोलिक, जिल्हा सचिव उमेश सातदिवे,जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कांबळे,रवी बनसोडे,दिपक म्हस्के,बी.एस.पवार, राजु भिगारदेव,पंडीत हिवाळे,आकाश मोरे,संतोष जाधव,सुमित जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.