शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा बीड पॅटर्न, महाविकास आघाडीच्या निर्णयाची नव्या सरकारकडून अंमलबजावणी

27

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

बीड(दि.3जुलै):-केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी म्हणून ओळखली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना आता गुंडाळून त्याऐवजी पीक विम्याचा बीड़ पॅटर्न राज्यात लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या संकटामुळे शेतीच्या होणाऱया नुकसानीपोटी शेतकऱयांना भरपाई देण्यासाठी केंद्राची प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2016 पासून देशभरात राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ शेतकऱयांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत असल्याचा आरोप करीत या योजनेत सुधारणा करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारकडून सातत्यांने केंद्राकडे केली जात होती. त्याची दखल घेत सध्याच्या प्रधानमंत्री पीक विमान योजनेसोबतच राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या 80-110 सुत्रानुसारच्या बीड पॅटर्न पीक विमा योजनेस केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर सरकारने ही योजनाच राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.