रस्त्यावरती सापडलेले दहा हजार रुपये प्रमाणिक पणे दिले माघारी: सोनु गायकवाड

🔸शेतकरी हुसेन शेख यांनी पैसे हातात दिल्यानंतर तुमच्या रुपात साक्षात देवच भेटला

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.3जुलै):-कुरुल एम. एस. ई. बी. मध्ये कार्यरत असणारे सोनु गायकवाड,रघु घोडके हे दोघे ही कुरुलचे रहिवासी आहेत. दि.३१ तारखेला हे दोघे कुरुल मधील लोकमंगल बँकेमध्ये लाईट बिल भरण्यासाठी गेले होते.पैसे भरुन रिटर्न एम.एस.सी.बी ऑफिसकडे येत असताना कुरूल पासून दीड किलोमीटर अंतरावरती त्यांना पैशाचा बंडल दिसला.पैसे घेतले व कुणाचे पैसे असतील त्यांना आपण माघारी देऊ असा निर्णय दोघांनाही घेतला.आपण स्टेटस व व्हाट्सअप ग्रुप वरती मेसेज शेअर करुन कुणाचे असतील त्यांना रक्कम किती होती ओळख सांगितल्यानंतर त्यांना देऊन टाकु ..

रस्त्यावर चालत असतांना अनेकदा पैसे सापडणे ही सामान्य गोष्ट आहे. साहजिकच अनेक जण ते पैसे उचलून खिशात ठेवतात. काहीजण ती लक्ष्मी समजून जपून ठेवतात तर काही जण लगेच खर्च करुन टाकतात.काहीजण रस्त्यात पैसे सापडणे याला नशीबवान म्हणतात तर काहीजण पि-डा म्हणतात. परंतु या दोघांनी पैशाच्या मोहात न अडकता त्यांना आपल्या स्टेटस व व्हाट्सअप ग्रुप वरती मेसेज शेअर केले आणि जे कुणाचे पैसे असतील त्यांनी रक्कम किती होते.ओळख पटवुन रक्कम घेऊन जावे कुरुलच्या एमेसिबी ऑफिस मध्ये संपर्क करावा.

——
शेजबाभुळगाव येथील शेतकरी हुसेन गफुर शेख शेतीच्या मशागतीसाठी करण्यासाठी कुरुल डि.सी.सी. बँकेतून पैसे काढून गावाकडे जात असताना पैसे पडलेली त्यांना माहित नाही. ज्यावेळेस घरी गेले त्यावेळेस पैसे पाहिले त्यावेळेस त्यांना पैसे आपल्याजवळ नाहीत म्हटल्यानंतर पैसे कुठे पडले हे विचार करत ते त्यांच्या राहत असलेल्या घरापासून गावापर्यंत पाहत आले परंतु पैसे सापडले नाही. वाहतूक कमी आहे त्या रस्त्याला पैसे आपल्याला सापडले नाहीत. जर कुरुल पंढरपूर रस्त्याला जर पैसे पडले असतील तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून विचार करत बसले, दुष्काळात तेरावा महिना,पंरतु दुसऱ्या दिवशी गावातील व्हाट्सअप ग्रुप वरती व्यक्तीने सांगितले की मेसेज आले आहे कुरुल मध्ये पैसे सापडले आहेत जे कोणाचे असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे त्यावेळेस त्यांनी संपर्क साधला असता रक्कम किती होती बरोबर सांगितल्यामुळे बँकेचे स्टेटमेंट पाहून रक्कम त्यांच्या हातात दिली त्यावेळेस त्यांच्या तोंडून जे उदगार निघाले तुमच्या रुपामध्येच मला देव भेटला. कारण हे पैसे जर दुसरीला सापडले असते तर आम्हाला मिळाले नसते. आज काल पाचशे हजार रुपये सापडली तर लोक पैसे देत नाही. तुम्ही तर एवढी मोठी रक्कम चहा न पिता आम्हाला परत दिली.

या कलियुगामध्ये प्रामाणिकपणा खूप कमी लोकांमध्ये राहिला आहे. कारण उसने घेतलेले लोक पैसे देऊ शकत नाहीत. कारण तुम्ही पाहत असालच पेपर मध्ये बातम्या एखाद्या अकाउंट वरती चुकून पैसे सेंड झाले तर एका सेकंदामध्ये अकाउंट वरचे पैसे काढून खरचुन टाकले जातात. किंवा दुसऱ्या अकाउंट वरती टाकली जातात. परंतु सोनू गायकवाड व रघु घोडके व महाविरण टीमच पंचक्रोशी मध्ये व अंकोली ,शेजबाभुळगाव मध्ये कौतुक होत आहे.यावेळी सोनू गायकवाड,रघु घोडके, पद्मसिंह जाधव, प्रमोद भानवसे, दिपक जाधव आदीसह उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED