रयत सेवक मित्र मंडळ ही संघटना रयत बँक निवडणुकीत इतिहास घडवणार – कारभारी वेलजाळी

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.4जुलै):-दि रयत सेवक को-ऑफ बँकेची पंचवार्षिक निवडणूकीचे प्रत्यक्ष मतदान दि.24 जुलै 2022 रोजी होणार आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी रयत सेवक मित्र मंडळ या संघटनेने, *रयत मित्र मंडळ* हा पॅनल उभा केला आहे. या पॅनलच्या प्रचारार्थ आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल,आडगाव या शाखेमध्ये प्रचार मेळावा खूप उत्साहात संपन्न झाला. या प्रचार मेळाव्याचे अध्यक्ष रयत सेवक को-ऑफ बँकेचे माजी संचालक मा.श्री तुकाराम शिंगाडे बापू होते. या प्रचार मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी संचालक मा.श्री कारभारी वेलजाळी, मा.श्री गुलाबभाई पठाण, श्री आर.एस. डोळे हे आवर्जून उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,आपल्या सर्वांचे दैवत, पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील व रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व महिला आघाडीच्या हस्ते करण्यात आले.

या प्रचार मेळाव्याचे प्रास्ताविक मा.श्री बालाजी बोंबडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विविध शाखांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रयत सेवकांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या मेळाव्यामध्ये रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक मा.श्री कारभारी वेलजाळी सर, मा.श्री गुलाबराव पठाण सर, श्री.आर.एस. डोळे सर, मा.श्री बापू शिंगाडे सर तसेच संघटनेचे उपाध्यक्ष मा.श्री मच्छिंद्र पिलगर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व मान्यवरांनी *रयत सेवक मित्रमंडळ पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला*. या मेळाव्यात सर्व संभाव्य उमेदवार उपस्थित होते.

*रयत सेवक मित्रमंडळ या संघटनेचे अध्यक्ष मा.श्री नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी त्यांनी माजी संचालकाने बँकेच्या कारभारामध्ये जो अनागोंदी कारभार चालवलेला आहे यावर त्यांनी तिखट प्रहार केला. मागील संचालकाने सन 2019-20 चा न मिळालेला डिव्हीडंट , बुडालेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑफ बँकेत ठेवलेल्या 11कोटी ठेवीबद्दल, अपारदर्शकता व गोपनीय कारभाराबद्दल व यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली.आता बँकेमध्ये नवा, बदल हवा असे आवाहन उपस्थित सर्व रयत सेवकांना केले. आम्ही बदली साठी नव्हे तर बदला साठी या निवडणुकीत उतरलो आहे. पुढील पाच वर्षांसाठी 13 मुद्दामच अजेंडा मतदारांपुढे मांडून सभासदांची बँक ही सभासद हिताच्या दृष्टीने चालवली जावी,सभासदांना विश्वासात आणि विचारात घेऊन निर्णय घेतले जावेत.ऑनलाईन बँकिंग,मेडिक्लेम, इन्शुरन्स, कमी आणि स्थिर व्याजदर,15% लाभांश,मयत सभासदांना 100% कर्जमाफी, सेवानिवृत्त सभासदांना ठेवींवर 1% अधिक व्याज,सभासदांच्या सुख दुःखात सहभाग व आपलेपणाची व सन्मानाची भावना,ग्राहक सेवा केंद्र,इत्यादी मुद्दे मांडून संघटनेची भूमिका स्पष्ट केले.*

*बँक निवडणूक ही साध्य नसून सेवक हिताचे साधन आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.तसा रयत बँकेत परिवर्तन अटळ आहे. याचे साक्षीदार बनण्यापेक्षा कोणाच्याही दबावाला व प्रभावाला बळी न पडता या बदलाचे भागीदार व्हावे असे मत संघटनेचे संघटक मा.श्री.दिपक भोये यांनी व्यक्त केले*

*कर्मवीरांच्या विचारांचा वारसा आणि संघर्षाचा वसा घेऊन मित्र मंडळाची ताज्या दमाची ही नवीन पिढी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.त्यामुळे विजयाचा गुलाल मित्र मंडळाचाच असणार असा विश्वास संघटनेचे सचिव मा. श्री.भीमा लेंभे यांनी व्यक्त केला.*

तसेच याप्रसंगी श्री विक्रमसिंह देसाई ,श्री.बाळासाहेब जगताप,श्री अशोक कोलते,श्रीमती आशालता शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात श्री.तुकाराम शिंगाडे बापू यांनी सांगितले की,मागील सहा महिन्यांपासून संवाद दौऱ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य सेवकांपर्यंत पोहचून मित्र मंडळाबद्दल सुप्त लाट तयार केली आहे. त्यामुळे प्रचारात आघाडी घेतली, कार्यकर्त्यांची एकजुट उमेदवारी अर्ज भरतांना दिसून आली. त्यामुळे मित्र मंडळाचाच विजय होणार नव्हे झाला आहे हे आजच मी जाहीर करतो. मित्र मंडळाच्या लाटेला थोपवण्याची ताकद विरोधकामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची ढाल पुढे करून आपला पॅनल हा संस्थेचा पॅनल असल्याचे भासवले जात आहे. मुळात सर्वच पॅनल हे संस्थेचेच आहेत.ते काही बाहेरून मागवले नाहीत.त्यामुळे मतदारांची दिशाभूल करू नये. विरोधकांनी बँक विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री डॉ.धनंजय कच्छवे यांनी व आभार संघटनेचे कोषाध्यक्ष मा.श्री सुहास भावसार यांनी केले.या प्रचार मेळाव्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष मा.श्री खंडू कांबळे सर व मा.श्री मच्छिंद्र पिलगर सर, आश्रम शाळा विभागाचे मा.श्री अरुण गारुडकर साहेब, सहसचिव बापू काळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप तुपे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री कोकणे सर, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.श्री गोरख बोरसे,सौ.अनुसया मरभळ,श्री .प्रा.अशोक झरेकर,श्री सचिन आढळराव,श्री सुरेश तिटकारे,श्रीमती ज्योत्स्ना बाळसराफ,श्री.श्रीराम केदार,श्री. राजेंद्र शिर्के, श्री रमेश खुटारकर,श्री. सोमनाथ बनसोडे तसेच परिसरातील विविध शाखांमधील रयत सेवक डी. एस.एम ची परीक्षा असतांनाही संस्थेच्या विविध जिल्ह्यातील संघटनेचे सर्व सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने या प्रचार मेळाव्यासाठी उपस्थित होते.या प्रचार मेळाव्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी,संभाव्य उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने,उत्साहाने या प्रचार मेळाव्यात सहभागी झाले.