मनसेच्या महिला आघाडी चामोर्शी तालुकाध्यक्ष सरिताताई नैताम यांची निवड

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.5जुलै):-येथे संवाद दौरा आणि पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्य माननीय हेमंतजी गडकरी महाराष्ट्र राज्य मनसे सरचिटणीस, संवाद दौऱ्यासाठी मुंबईवरून आलेले मनविसे प्रमुख संघटक मा. संतोष गांगुर्डे, मा. चेतन पेडणेकर, मनसे जिल्हाध्यक्ष मा.राजूभाऊ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मा. रंजीतभाऊ बनकर यांच्या उपस्थित मनसे पक्षात पक्ष प्रवेश केला माननीय हेमंत भाऊ गडकरी यांनी सरिता ताई नैताम यांची चामोर्शी महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी नेमणूक केली.

सरिताताई नैताम ह्या राज साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली व विचाराला प्रेरित होऊन व मनसेचा कट्टर समर्थक अशी यांची ओळख यांनी पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी कार्य करीन माझे श्वास असेपर्यंत मी मनसेत काम करत राहील अशी ग्वाही देऊन.

मनसे जिल्हासचिव डॉ. राजेंद्र गडपलिवार जिल्हा उपाध्यक्ष रंजीतभाऊ बनकर,हरीश वलादे,विभा बोभाटे तालुकाध्यक्ष राकेश सोनकुसरे, मनविसे तालुका अध्यक्ष शेषराज सोनकुसरे, तालुका उपाध्यक्ष संतोष प्रधान, प्रदीप दोनाडकर, जिल्हा मीडिया प्रसिद्धीप्रमुख राजू गुडेकर, आपल्या निवडीचे श्रेय यांना दिले. त्याचप्रमाणे हर्षल बोरकुटे मनोज बावणे.डोंगरे, सर्व उपस्थित मनसे सैनिकांचे आभार मानले

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED