जुगार अड्ड्यावर छापा दोघांवर कार्यवाही

29

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6जुलै):-स्थानीक इंदीरा नगर येथील जगदंबा देवी मंदिराच्या परिसरात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहीती पोलीसाना मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी सापळा रचत छापेमारी करत त्या सुरू असलेल्या जुगार अड्‌यावर कार्यवाही केली.उपपोलीस निरीक्षक विनित घाटोळ व बिटजमादार नरेन्द्र पंडु यांना माहीती मिळाल्या नंतर यांनी छापा मारला सदर छाप्या मध्ये जुगार खेळणाऱ्या पैकी दोन आरोपी विरुद्ध कार्यवाही करण्यात आली.

व जप्तीमध्ये रोख 9800 रुपये मिळाल्याची माहीती बिटजमादार पुंड यांनी दिली तसेच एका जवळ 7000 रुपये व दुसऱ्या जवळ 2800 रुपये, व पत्त्याचे ताष एकुण 9800रुपये जप्ती करून रमेश फकीरा खंदारे वय 47 रा .संत चोकामेळा वार्ड , गणेश किशोर निमजवार वय 30 पाटील नगर उमरखेड यांच्या विरुद्ध जुगार अॅक्ट नुसार कलम 12अ लावून सुचना देऊन सोडण्यात आले.

पंरतु सुत्राच्या माहीती नुसार सदर जुगार अड्ड्यावर 60 ते 70 हजार रुपये अशल्याची माहीती मिळाली आहे.व शहरात चर्चा ही जोरात सुरू आहे जुगार खेळणारे दहा ते बारा लोक असतांना फक्त दोघांनाच पकडण्यात आले? याही विषयावर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.