वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य युवा आघाडीचे निवेदन

53

✒️ब्रम्हपुरी (रोशन मदनकर, तालुका प्रतिनिधी)

ब्रम्हपुरी(दि-2जुलै):- लाकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत असताना महावितरण कंपनीने तीन महिन्याचे सरासरी बिल ग्राहकांना पाठविले. लाकडाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे बिल कसे भरावे,असा प्रश्न निर्माण झाली आहे. वीज बिल माफ़ करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य युवा आघाडीच्या वतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.
वीज वितरण कंपनी,ब्रम्हपुरीचे अभियंता यांच्या मार्फत विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष सुदाम राठोड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत राज्य शासनाने लाकडाऊन जाहीर केले. लाकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले,त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
           विदर्भात 70 टक्के वीज निर्मिती होते, या करिता     विदर्भातील कोळसा,पाणी, जमीन वापरले जाते, विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण मिळत आहे, असे अनेक मुद्दे निवेदनात मांडले आहेत.
        लाकडाऊन मुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वीज बिल माफ करा,अन्यथा विदर्भ राज्य युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदन सादर करताना विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष सुदाम राठोड, अमर गाडगे, विशाल आसुटकर,प्रजवल वाघमारे, कुंदन लांजेवार, सुधा राऊत, गितताई सोनटक्के,लीना जोगे,मारोती भानारकर,बंडू मेश्राम, अमोल मेश्राम, नरड आदी उपस्थित होते.