पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे – माऊली राजे मुठाळ

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.6जुलै):-भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना शिंदे – फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी डिग्रस येथील युवा कार्यकर्ते माऊली राजे मुठाळ यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे. पंकजाताई मुंडे ह्या ओबीसी नेत्या आहेत, राज्यात मोठा जनाधार पंकजाताई याच्या पाठीशी आहे. गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यात ताईंचा सिंहाचा वाटा होता . महिला व बालकल्याण, ग्रामविकास हि महत्त्वाची खाती ताईं कडे होते.

अंत्यत कतृव्य दक्षतेने ताईनी कार्य करत तळागळात, सामान्य जनते पर्यंत योजना पोहचवत पदाला व लोकांना न्याय दिला. जलयुक्त शिवार सारखी अंत्यत महत्वाकांक्षी योजना राबवत राज्य पाणीदार केले त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न मिटला व पाणी पातळीत वाढ देखील झाली. आजही दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा व कार्य सामान्य जनता पंकजाताई मध्ये पाहत आहे. जनतेला एक आशा आहे कि ताईंना मंत्री पद मिळाले तर बीड जिल्ह्य्या सारख्या दुष्काळी व मागास भागाचा विकास होण्यास मदत होईल म्हणून शिंदे – फडणवीस सरकार मध्ये पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावे अशी मागणी मुठाळ यांनी केली आहे.

पुढे बोलतांना मुठाळ म्हणाले कि, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आपण सर्वांनी बघितला महा विकास आघाडीच सरकार कोसळल आणि शिंदे – फडणवीस भाजपाचे सरकार स्थापन झालं आता आमची सर्व कार्यकर्ते ची मागणी आहे की पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपद मिळावे कारण स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी शेवट पर्यंत भाजपा वाढवन्यासाठी जीवाचं रान केलं पुढे पंकजाताई मुंडे या मुंडे साहेबांचा वारसा चालवत आहेत. त्याच धडाडीने गोर गरीब जनतेसाठी नेतृत्व करत आहे कामात अजून जास्त बळ येवो त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ताईंना मंत्री पद द्यावे अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED