जवाहर विद्यालयात गुणवतांचा सन्मान सोहळा संपन्न

27

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.7जुलै):- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा व जवाहर विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा येथे यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आय.एफ.एस.पदी निवड झाल्याबद्दल चांदा गावचे सुपुत्र श्रीकांत भानुदास केळगंद्रे , तसेच चि. आशिष भाऊसाहेब दहातोंडे या दोन्ही ही जवाहर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल तसेच इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सदस्य नानासाहेब अंबाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ.दीपकजी शिंदे साहेब, गावच्या सरपंच सौ.ज्योती दीपक जावळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे,प्रा.अशोकराव चौधरी,माजी जि.प.सदस्या सौ.विजयाताई नानासाहेब अंबाडे,माजी पं.स.सभापती कारभारी जावळे, विद्यालयाचे प्राचार्य, हरिभाऊ जावळे,उप प्राचार्य रघुनाथ भोजने, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशिनकर, ज्येष्ठ शिक्षक राजेश शेंडगे, अर्जुन वैरागर, श्रीमती शरयू मरडे, श्रीमती रुख्मिनी सोनवणे, श्रीमती युवरा गायकवाड, महेश लोखंडे,अनंता शेळके,दीपक निमसे,संभाजी कांबळे,श्रीमती संजीवनी नवल,सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार,गणपत पुंड,किरण जावळे,पत्रकार अरुण सोनकर, बाबासाहेब दहातोंडे,प्रबोधिनी न्युज चॅनल प्रतिनिधी बंडू दहातोंडे, जि.प.शाळा चांदा च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शांता मरकड- दहातोंडे, सौ.मचे मॅडम, बाळासाहेब जावळे, सादिक शेख, माजी विद्यार्थी संघाचे संतोष कानडे, ज्ञानेश्वर होंडे,अंबादास धुमाळ, माजी सैनिक भानुदास केळगंद्रे, बशीर शेख यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

माजी विद्यार्थी संघटनेचे संतोष कानडे व प्रा.रावसाहेब राशिनकर यांनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करताना पुस्तके भेट दिली.शिक्षकेतर कर्मचारी प्रणित कोडम यांनी अप्रतिम असे फलक रेखन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांनी केले, सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विद्यालय समन्वयक प्रा.भाऊसाहेब तांबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती स्वाती दळवी यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.